आष्टी (शहीद)-/ येथील क्रांती ज्ञानपीठ शाळेत दिनांक ६ डिसेंबर डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “महापरीनिर्वाण दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांती ज्ञानपीठ शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा ठाकरे होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यध्यापिका वंदना लेकुरवाडे होत्या. शाळेतील विद्यार्थ्यानी डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या शब्दात व्यक्त केले. तसेच “शिका व संघटित व्हा आणि संघर्ष करा “असा संदेश पोहचवीण्याचे कार्य क्रांती ज्ञानपीठ शाळेच्या चिमुकल्याणी केले.कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांनी आपले यथोचित विचार यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन अपूर्वा धोंगडी तर प्रास्ताविक तृप्ती काकपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा नवलाखे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी पाटील, सोनाली कुडूपले, मयुरी साबळे, ओमिका काळे, सुलभा उमेकर, प्रेमा गुल्हाने, अंकिता दापूरकर, नयना शेटे, मदनकर,सुलभा उमेकर, भाग्यश्री वांदे आणि विनया साबळे यांनी अथक परीश्रम घेतले.