आष्टी येथे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या भूमी अभिलेख चे उपअधीक्षक व अनेक कर्मचारी गैरहजर,असल्यामुळे ध्वजारोहण अपूरच…

0

हेच ते आष्टी येथे भूमी अभिलेख,अधिकारी व अनेक कर्मचारी हजर नसल्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम राहला अपुराच.हाच तो भूमी अभिलेख कार्यालयाचा उपअधीक्षक मोहन वनवे महाराष्ट्र दिनी हजर न राहूण सतत नागरिकांना त्रास देऊन लेआउट धारक व धनाड्य लोकांकडून अवैद्य वसुली करून काटोल अमरावतीत चल अचल संपत्ती जमा करनारा.

आष्टी शहीद / महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपअधीक्षक आष्टी भुमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यासह अनेक कर्मचारी गैरहजर असल्याने त्यांना महाराष्ट्र दिनाबद्दल किती आदर आहे ते दिसून आले.माहितीप्रमाणे महाराष्ट्र दिन निमित्य तहसील कार्यालय येथे झेंडावंदन चे कार्यक्रम होते तहसील कार्यालयाला लागून उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे.या कार्यालयाचे उपअधीक्षक मोहन वनवे हे काटोल येथून येणे जाणे करतात परंतु एक मे महाराष्ट्र दिन ला झेंडावंदन झाल्यावर नऊ वाजेपर्यंत ते गैरहजर होते त्यांचे कार्यालयात आमचे प्रतिनिधी यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केली असता फक्त दोन कर्मचारी हजर होते व त्यांनी वनवे आले नाही याला दुजोरा दिला.वनवे हे आठवड्यात दोनच दिवस कार्यालयात येते व उर्वरित दिवस काटोल निवासस्थानावरून काम काज बघतात.काही महिन्यापूर्वी या कार्यालयाचे पदभार सांभाळणारे उपाधीक्षक वनवे यांनी नागरिकांना नाहक त्रास देणे सुरू केलेले असून प्रत्येक कामा करिता लक्ष्मी दर्शन ची अपेक्षा असल्याने उलट सुलट त्रुट्या  काढून दर्शन मीडे पर्यंत नागरिकांना त्रास देण्यात येत आहे.उपअधीक्षक वनवे यापूर्वी कारंजा येथे कार्यरत होते. त्यांनी कारंजा येथे लेआउट धारक व हायवेवर जमिनीत खरेदी करणारे धण्याडय लोकांकडून अवैध वसुली करून काटोल,अमरावती येथे चल अचल संपत्ती जमा केल्याची माहिती मिळालेली आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.मोहन वनवे यांच्याशी दूरध्वनीवर आमचे प्रतिनिधींनी संपर्क साधले असता त्यांनी पूर्णता खोटे उत्तर दिले की मी झेंडावंदन ला हजर होऊन त्वरित निघून आलो परंतु याची शहानिशा केल्यानंतर त्यांचे म्हणणे पूर्णतः खोटे असल्याचे स्पष्ट झाले.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!