आमदार दादाराव केचे यांनी केला विनोद मांडवे यांचा सत्कार.
आष्टी (शहीद) -/ शहरातील विनोद हिंम्मतराव मांडवे यांची (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.त्याबद्दल विनोद मांडवे यांचा आर्वी विधनसभा मतदार संघाचे आमदार दादाराव केचे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार दादाराव केचे यांनी त्यांचे वडील हींमतराव मांडवे आणि मातोश्री नर्मदाबाई मांडवे यांच्याशी सुध्दा संवाद साधुन त्यांचे अभिनंदन केले.विनोद मांडवे हे अत्यंत बिकट परीस्थितीत शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत कसे पोहोचले हा आदर्श युवकांनी घेणे गरजेचे आहे असे यावेळी आमदार दादाराव केचे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी आष्टी शहर भाजपाचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक अॅड.मनिष ठोंबरे, नगरसेविका मीना डोईफोडे,जेष्ठ कार्यकर्ते विलास चोहटकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचार प्रमुख सुनील मांडवे,तालुका कार्यवाह आकाश भनेरकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध दंडाळे, भाजपा युवा मोर्चाचे नेते आवेज खान, अविनाश कदम, भाजपा शहर सरचिटणीस दिनेश चव्हाण,माजी नगरसेवक अजय लेकुरवाळे, सुरेश काळबांडे, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनिल साबळे,बलसिंग मांडवे, भुषण मांडवे,सामाजिक कार्यकर्ते अक्षय केचे,अनिल डोईफोडे,भुषण टाक,सुजल बानाईत,सौरभ तायडे, अंकुश बावने, अविनाश कदम, अब्दुल हमीद यांच्या सह शहरातील भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.