आ. कुणावारांनी केला ६८ वर्षीय दहावी उत्तीर्ण आजीचा हृदय सत्कार……

0

🔥आमदार समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पार पडला सत्कार सोहळा.

हिंगणघाट -/ हिंगणघाट तालुक्यातील जामणी ( गोजी ) येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेने ५१ टक्के गुण प्राप्त करीत नुकतीच १० वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.
याची विशेष दखल घेऊन आ. कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
त्या तालुक्यातील बुरकोणी येथील मूळच्या रहिवासी आहेत इंदुबाई सिंधुजी सातपुते अशी त्यांची पूर्वाश्रमीची ओळख व जामणी(गोजी) येथील बोरकर परिवारात त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या श्रीमती इंदुबाई ज्ञानेश्वरजी बोरकर या नावाने ओळखल्या जातात.
विवाहानंतर अनेक वर्षे कुटुंबाचे पालनपोषण करण्यात वेळ गेला परंतु मनात १० वी अनुत्तीर्ण असल्याची खंत होती,
शेवटी सत्र २०२४- २५ मध्ये वयाच्या थेट ६८ व्या वर्षी त्यांनी ५१ टक्के गुण प्राप्त करीत १० वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण करीत समाजापुढे आदर्श निर्माण केला.
त्यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन हिंगणघाट या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतले.
त्यांनी दहावीत भारत विद्यालय वेळा येथे प्रवेश घेऊन दहावी उत्तीर्ण केली.
त्यांना दोन मुले व एक मुलगी,नातवंड असा मोठा आप्तपरिवारआहे.
त्यांनी वयाचे ६८ वर्षातही शिक्षणाची जिद्द बाळगून तरुण विद्यार्थी, विद्यार्थिनीनाही अंतर्मुख करणारे यश प्राप्त केले आहे.
अशा या आजीच्या यशाची दखल घेऊन आमदार समीर कुणावार यांनी आज हिंगणघाट येथील स्थानिक जन संपर्क कार्यालयात हृदय सत्कार केला.
याप्रसंगी भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, बाळासाहेब इंगोले, रविभाऊ दांडेकर , प्रमोद नौकरकर, कमलाकर महाकाळकर, भारती महाकाळकर, उषा बाभुळकर, कुसुम रंगारी, मीना देशमुख, सुदा चौधरी, शितल वाणी, अपर्णा हिवंज इत्यादी तसेच त्यांचे कुटुंबीय, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news 24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!