आर्वी -/इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मानले जाणारे प्रेषित हजरत मुहम्मद साहिब यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा उत्सव मला गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतो. समाजातील अंतिम घटकाची सेवा दररोज नित्यनेमाने करत असल्याने पैगंबरांच्या शिकवणी अनुसरनीय आहे असं सुमित वानखेडे यांनी ईद – ए – मिलाद उत्सवाच्या निमित्ताने सांगत हा सण इस्लामी लोकांना एकात्मतेत बांधतो सोबतच आर्वीत या सणाच्या निमित्ताने अद्भूत उत्साह दिसत असुन सर्व धर्मियांनी या उत्सवात सहभागी होत ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ चे दर्शन होत आहे असे वानखेडे व्यक्त होतांना पुढे म्हणाले.इस्लाम धर्मात ईद मिलाद- उन- नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून आर्वी मतदारसंघात आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात साजरा केला गेला. एक विशेष इस्लामी सण म्हणून सर्व समाजाचे बांधव या दिवशी एक भारत श्रेष्ठ भारत असे चित्र मतदारसंघात होते. या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित करण्यात आले होते. सुमित वानखेडे यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची सकाळ पासून शुभेच्छा देण्यासाठी रेलचेल होती. मुस्लिम बांधवांनी रॅलीचे आयोजन केले होते त्यात सुमित वानखेडे हे सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी असलेल्यांना मिष्टान्न, खाद्य पदार्थ चे जागोजागी स्टॉल समाज बांधवांनी लावले होते. सुमित वानखेडे यांना प्रत्येक स्टॉल वर मुस्लिम बांधवांनी निमंत्रित करून मतदारसंघाच्या विकासासाठी उत्तम काम करत असल्याने जागोजागी सुमित वानखेडे यांचा यथोचित सत्कार केला .नुकताच आष्टी शहीद येथील टेकडी दर्गा परीसरातील मुस्लिम कब्रस्थान चे सौंदर्यीकरण साठी 1 कोटींचा निधी सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांनी मिळाला असल्याने आष्टीतून मुस्लिम समाजांनी सुमित वानखेडे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच कारंजातील मुस्लिम बांधव हे देखील सुमित वानखेडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. ईद – ए – मिलाद च्या निमित्ताने आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या विविध प्रेरणास्थळी मशिदींमध्ये प्रार्थना करण्यासाठी समाज बांधवांची रेलचेल होती.