शैक्षणिक साहित्य यांचे मदतीने विद्यार्थी शिक्षणात प्रगती करू शकतो,मुख्याद्यापक प्रशांत ढोले
देवळी -/तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोळोणा चोरे येथील शाळेत रोटरी क्लब, नागपूर साऊथ येथील पदाधिकारी साई राजे भोसले (अध्यक्ष, रोटरी क्लब, नागपूर, साऊथ ), प्रवीण ढोरे, संचालक (रोटरी क्लब, नागपूर, साऊथ ), फर्स्ट लेडी जोस्ना बाजारे, रोटरीयन मिल्का ढोरे, रोटरीयन कल्याणी कावडे, सोनटक्के साहेब हे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रशांत ढोले, प्रमुख उपस्थिती म्हणून शोभा कुरसिंगे, उपसरपंच, प्रविणा प्रशांतराव मैत्रे, राजश्री सुनीलराव शेरजे, राठोड सर, विवेक डहाके उपस्थित होते.प्रत्येकाला विद्यार्थी याला नोटबुक, काही विद्यार्थी याला बॅग, टिफिन डब्बा, पाणी बॉटल इत्यादी साहित्य भेट दिले.रोटरी क्लब नागपूर साऊथ च्या वतीने उच्च प्राथमिक शाळा, कोळोना (चोरे ) येथे वृक्षरोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रविणा मैत्रे मॅडम यांनी केले. आभार राजश्री शेरजे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊराव थुल, विवेक डहाके, सुजल सुरपाम, चैतन्य अढाऊ, नैतिक कौराते यांनी परिश्रम घेतले.