आष्टी शहीद / येथे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या भ्रष्ट व त्रासदायक भूमिकेमुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने महसुलात वाढ होण्याच्या दृष्टीने खेडेगावांना गावठाण मध्ये समाविष्ट केल्याने तालुक्यातील नगरपंचायत असो की ग्रामपंचायत येथील नागरिकांना खरेदी विक्रीचे व्यवहार करिता व घर व शेतजमीन मोजमाप करण्याकरिता नागरिकांना या कार्यालयाशी संपर्क करावा लागतो परंतु या कार्यालयात साधारण अर्ज स्वीकारत नसून नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याकरिता पाठविण्यात येते व सेतू केंद्रात ऑनलाइन अर्जाची रक्कम १५० रुपये प्रमाणे वसूल करून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्यात येते जी सत्यप्रत व २० रुपयात कार्यालयात मिळत होती तिला ऑनलाईन मध्ये १३० ते १५० रुपये द्यावे लागते ऑनलाईन अर्ज केल्यावर त्यामध्ये कार्यालयीन पद्धतीला महिना लागते व त्या नंतर मुख्य उपअधीक्षकाच्या स्वाक्षरीला पुन्हा महिनो लागतील त्यामुळे लोकांना नाहक त्रास होत आहे गावठाण मधील तात्काळ मोजणीची फी घेऊन त्या मोजणीला दोन दोन महिने लावण्यात येते व नागरिकांना तांत्रिक अडचणीचे कारणे सांगून परत करतात दोन महिने अगोदर या कार्यालयाचे पद भार सांभाळणारे मोहन वनवे उपअधीक्षक अधिकारी हे आठवड्यात दोन दिवस कार्यालयात येतात व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मीटिंगच्या कारणांनी घेऊन बसतात त्यामुळे कार्यालयीन कामकाज प्रलंबित राहून नागरिकांना त्रास होतो याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे