उषा कांबळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्काराने केले सन्मानित
प्रतिनिधी/ वर्धा
नागपुर येथे राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन व राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार सोहळा श्री. गुरूदेव आश्रम सभागृह येथे घेण्यात आला होता.
या सोहळ्यामध्ये कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्यामुळे उन्नती लोकसंचालित साधन केंद्र वर्धा येथील अध्यक्ष उषा कांबळे यांना अहिल्ल्याबाई होळकर पुरस्कार विविध मान्यवारांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटक माजी ई.झेड. खोब्रागडे, गिरीश पान्डव, व न्यायाधिश अनिल वैद्य, तक्षशिला वाघधरे हे होते महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत उन्नती लोक संचालित साधन केंद्राच्या वर्धा येथील अध्यक्ष्या उषा कांबळे यांनी कोरोना महामारीच्या काळात रोज मजुरी करणारे, फुटपाथ वर राहणारे, गरजू, बेसाहरा लोकांना अश्या जवळपास आठशे कुटुंबान्ना अन्न धन्याच्या किट वाटप केल्या सोबतच कोरोना पेशन्टला ही मदत केली. एवढेच नाही तर लोकडॉन जाहीर झाल्यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती अश्या वेळी उषाताईनी घरात अडकून पडलेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला त्यांचे हे कार्य एवढ्यावरच थांबले नाही तर कोरोना पेशन्ट ला सशक्त आहार म्हणून फळ सुद्धा पेशन्ट ला देवून मदत केली सोबतच सानिटायझर, मास्क वाटप करून कोरोना पेशन्ट चे मनोबल वाढवीत त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली त्यांची या कार्या ची दखल घेत नागपूर येथे झालेल्या राज्यस्थरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलनात माजी आयपीएस अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, न्यायाधीश अनिल वैद्य, गिरीश पांडव, तक्षशीला वाघधरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानीत करून त्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले..