एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे (ईडीआयआय) २४ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन; उद्योजकता अभ्यासक्रमांमधून ७४ विद्यार्थी झाले पदवीधर

0

🔥एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे (ईडीआयआय) २४ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन; उद्योजकता अभ्यासक्रमांमधून ७४ विद्यार्थी झाले पदवीधर.

गोवा -/ भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामार्फत ‘उत्कृष्टता केंद्र’ म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ईडीआयआय), अहमदाबाद या संस्थेचा 24वा पदवीप्रदान समारंभ 30 मे 2025 रोजी संस्थेच्या अहमदाबाद येथील कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास नीति आयोगाचे सदस्य, डीआरडीओचे माजी सचिव असून एक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय कुमार सारस्वत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी ईडीआयआयचे अध्यक्ष आणि आयडीबीआय बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा, ईडीआयआयचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला, वाडिलाल इंडस्ट्रीज लिमिटेड, अहमदाबाद या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश आर. गांधी, आयएफसीआय लिमिटेड, नवी दिल्ली या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल भावे आणि आयडीबीआय बँक लिमिटेडचे सीजीएम आणि लर्निंग अ‍ॅण्ड एम्प्लॉयी एंगेजमेंट विभागाच्या प्रमुख श्रीमती पूर्णिमा भार्गव हेही उपस्थित होते.
ईडीआयआयच्या 24व्या दीक्षांत समारंभात एकूण 74 विद्यार्थ्यांना पदविका आणि पदवीप्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट – एंटरप्रेनरशिप (पीजीडीएम-ई), पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट – इनोव्हेशन, एंटरप्रेनरशिप अँड व्हेंचर डेव्हलपमेंट (पीजीडीएम-आयईव्ही) आणि फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (एफपीएम) या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा समावेश होता. या समारंभाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्याची यशस्वी सांगता झाली. या पुढे हे विद्यार्थी विविध उद्योग/संस्थांमध्ये उद्योजकीय भूमिकांमध्ये पदार्पण करतील.
या वर्षीच्या पदवीधर बॅचमध्ये एकूण 74 विद्यार्थी आहेत. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट – एंटरप्रेनरशिप (पीजीडीएम-ई)चे 64 विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट – इनोव्हेशन, एंटरप्रेनरशिप अ‍ॅण्ड व्हेंचर डेव्हलपमेंट (पीजीडीएम-आयईव्ही)चे 8 विद्यार्थी आणि फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (एफपीएम)चे 2 विद्यार्थी यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी एकूण 12 राज्यांतील आहेत. पीजीडीएम-ई कार्यक्रमातील 21 विद्यार्थ्यांनी आपली पाच वर्षांची दृष्टीआराखडा योजना निश्चित केली आहे, तर 43 विद्यार्थ्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. काही विद्यार्थ्यांनी स्टुडंट स्टार्टअप इनोव्हेशन पॉलिसीअंतर्गत अनुदान मंजुरीही मिळवली आहे. त्यांनी निश्चित केलेल्या काही व्यावसायिक संधी पुढीलप्रमाणे आहेत : व्यावसायिक आणि निवासी वापरासाठी लघुपातळीवरील वाऱ्याच्या टर्बाइनची उपलब्धता; व्यावसायिक वातावरणात वेळेच्या व्यवस्थापनाच्या दैनंदिन अडचणी सोडवणारे सॉफ्टवेअर; वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह रक्त पुरवठा सेवा; निवासी इमारतींमध्ये डिजिटल लॉकर बसवणे, जेथे कुरिअर कर्मचारी पार्सल सुरक्षितरीत्या ठेवू शकतील आणि रहिवाशांना मोबाईल अलर्ट मिळाल्यानंतर ते कधीही पार्सल घेऊ शकतील; पाण्याचा वापर न करता आणि पर्यावरणपूरक पद्धतीने लोखंड धातूच्या गुणवत्तापूर्ण खनिजांचे शुष्क व व्यवहार्य प्रकारे संस्करण; तसेच विद्युत कार्यक्षमता व वापरकर्ता सुलभता लक्षात घेऊन तयार केलेली नावीन्यपूर्ण उत्पादने आणि इतर अनेक समकालीन व्यावसायिक संधी.
नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषणातून भारताच्या विकसित होत असलेल्या उद्योजकीय संधींविषयी माहिती दिली आणि त्यांच्या योगदानामुळे देशनिर्मितीच्या प्रक्रियेला कशी चालना मिळेल, यावर भर दिला. ते म्हणाले, “अनिश्चिततेत मार्ग काढण्याची तुमची क्षमता, अपूर्ण माहिती असतानाही निर्णय घेण्याची तयारी आणि नव्या वास्तवांनुसार आपले धोरण बदलण्याची लवचिकता – यावरच तुमचा दीर्घकालीन प्रभाव ठरणार आहे. जागतिक स्तरावर परस्पर जोडलेल्या आजच्या जगात, संस्कृतींमधील संवाद खूप महत्त्वाचा ठरतो. भारताची भाषिक, सांस्कृतिक वा आर्थिक विविधतेसाठी अशा उद्योजकांची गरज भासत आहे, जे विविध समुदायांमध्ये आणि परिस्थितींमध्ये परिणामकारक उपाय रचू शकतील. जागतिक स्तरावर यशस्वी सहकार्य साधण्यासाठी विविध संस्कृतीतील भागीदारांसोबत प्रभावीपणे काम करण्याची समज असणे गरजेचे आहे, आणि ते करताना आपली भारतीय मूल्यव्यवस्था आणि दृष्टिकोन जपणेही तितकेच महत्त्वाचं आहे. तुम्ही विकसित केलेला प्रत्येक उपाय, उभारलेला प्रत्येक व्यवसाय आणि हाताळलेले प्रत्येक नावीन्य केवळ त्याच्या व्यावसायिक यशाच्या आधारावर मोजले जाऊ नये, तर त्यातून भारताच्या सर्वांगीण विकासात होणाऱ्या योगदानाच्या दृष्टीनेही त्याचे मूल्यमापन व्हायला हवे. आपण सध्या भारताच्या प्रवासातील एका अद्वितीय वळणावर उभे आहोत, जिथे ‘विकसित भारत 2047’ ही संकल्पना केवळ सरकारची धोरणात्मक योजना नसून आपल्या सर्वांची सामूहिक आकांक्षा आहे – आणि ती साकार करण्यासाठी उद्योजकच या परिवर्तनाचे खरे शिल्पकार ठरणार आहेत.”
ईडीआयआयचे अध्यक्ष आणि आयडीबीआय बँक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राकेश शर्मा म्हणाले, “या वर्षी एप्रिलमध्ये ईडीआयआयने आपल्या स्थापनेचा 43वा वर्धापन दिन साजरा केला. गेल्या चार दशकांतील प्रवासात या संस्थेने उद्योजकता हा एक मान्यताप्राप्त अभ्यासक्रम म्हणून स्थापित करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. आज देशात जेव्हा उत्पादकता, स्पर्धात्मकता आणि एकूणच कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी उद्योजकतेचा एक प्रभावी साधन म्हणून विचार केला जात आहे, तेव्हा ईडीआयआय या विकास प्रक्रियेत नेतृत्व करत असून त्याला बळकटी देण्याच्या केंद्रस्थानी आहे. या संस्थेची देशभरातील सक्रिय उपस्थिती समाजातील विविध स्तरांमध्ये उद्योजकीय विचारसरणी आणि वर्तन बिंबवण्याचे काम सातत्याने करत आहे.”

ईडीआयआयचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला म्हणाले, “ईडीआयआयच्या स्थापनेपासूनच आम्ही नावीन्य, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक प्रभाव यांच्या आधारे नेतृत्व करू शकणारी उद्योजकीय प्रतिभा घडवण्यासाठी सातत्याने काम करत आलो आहोत. ईडीआयआयचा अभ्यासक्रम अत्यंत काळजीपूर्वक रचलेला असून, शैक्षणिक शिस्तीला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकीय पर्यावरण, धोरणात्मक विचार आणि नैतिक नेतृत्व याची सखोल समज मिळते. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना उड्डाणासाठी जे पंख दिली आहेत, त्याद्वारे ते निश्चितच यशाच्या नव्या उंचीवर पोहोचतील, असा मला विश्वास आहे. या उड्डाणात डॉ. सारस्वत यांची प्रेरणादायी उपस्थितीही निश्चितच अधिक बळ देणारी ठरणार आहे. या पदवीप्रदान समारंभात त्यांची उपस्थिती लाभली आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले, याचा आम्हाला खूप आनंद आहे.”
ईडीआयआयचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!