(एकाच वैद्यकिय अधिकाऱ्यावर रूग्णालय ) भिडी ग्रामिण रूणालयात रूग्णांची हेळसांड…..

0

🔥( एकाच वैद्यकिय अधिकाऱ्यावर रूग्णालय )
भिडी ग्रामिण रूणालयात रूग्णांची हेळसांड.🔥वैद्यकिय अधिक्षक पाहतो दोन रूग्णालय .

🔥वैधकिय अधिकारी पदे रिक्त.

🔥नेत्र विभाग फंक्त बूधवारलाच.

🔥वृद्ध नेत्र रूग्णांची झाली दयणिय अवस्था.

भिडी -/ येथिल ग्रामिण रूणालयाची दयणिय अवस्था झाली असून रूग्णांची डॉक्टर अभावी रूग्णांची होत आहे हेळसांड येथे रूग्णांचा कोणीही वाली नसल्याचे रूग्णालयाच्या कार्यभारावरून दिसून येत आहे भिडी येथिल वैद्यकिय अधिक्षक पाहतो दोन रूग्णालयाचा कार्यभार .रूग्णालय पाहते एकच वैद्यकीय अधिकारी .नेत्र विभाग फंक्त बूधवारलाच सूरू यातही नेत्र विभागातील शस्त्र क्रिया रूग्णांना मात्र सकाळ पासून तर सायंकाळी पर्यंत रूग्णालया बाहेर उपासिच ताटकळतच बसावे लागते आहे यात रूग्णांची दयणिय अवस्था बाबत न विचारलेले बरे असून या रूग्णालयाची आता उतरती कळा पाहून यांचे वाली कोन असा गंभिर प्रश्न येथे पडला आहे?याकडे कोन लक्ष पूरवेल असा सूर नागरिकांतून निघत आहे
सविस्तर असे की अवघ्या तिन ते चार वर्षा अगोदर भिडी ग्रामीण रूग्णालय जिल्ह्यात अव्वल होते या रूग्णालयाबाबत कोनिही बोट वर करीत नव्हते येथिल खाजगी रूग्णालये ओस पडली होती रूग्ण ग्रामीण रूग्णालयाकडेच वळत होती पन येथिल काही डॉक्टरांच्या बदल्या केल्याने रूग्णालयावर उतरती कळाच आली तर खाजगी रूग्णालयाचे बंल्ले बंल्ले झाले तर रूग्ण आर्थिक व मानसिक त्रासाने त्रस्त झाले
रूग्णालयाला एक वैद्यकीय अधीक्षक,तर तिन वैद्यकीय अधिकारी पदे असतांना येथिल वैद्यकीय अधीक्षक हे पूलगाव ग्रामिण रूणालयाचा कार्यभार सांभाळतात यांच्या कडे दोन रूग्णालयाच्या कार्यभार असल्याने ते येथिल कधिही बाह्य रूग्णांची तपासनी करीत नसल्याची ओरड रूग्णातून व ग्रामस्थांतून ऐकायला मिळतात तर येथे वैद्यकीय अधिकारी तिन पदे असून कार्यरत एकच वैद्यकीय अधिकारी रूग्ण पाहतात दोन पदे रिक्त आहे याचं एकच वैद्यकीय अधिका-यांच्या कंक्षा बाहेर बाह्य रूग्णांच्या ताटकळत उभ्या तपासनीस रांगा दिसतात यात़ ताटकळत उभे राहू राहून त्रस्त झाल्याने खाजगी रूग्णालयाकडे जावे लागतात यात रूग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे
येथिल नेत्र विभाग हा बंद अवस्थेत असून नेत्र चिकीस्तक फंक्त दर बूधवारलाच नेत्र तपासणी करतात तर रोज येणारे नेत्र रूग्ण रूग्णालयातून परत जातात या अगोदर येथिल नेत्र विभाग सतत सूरू राहत होता आता हपत्यातून बूधवारच एक दिवस यात कूठे मासी सिकली हे मात्र कळायला येत नाही याचा भूर्दंड मात्र वयोवृध्द रूग्ण या परिसरातील भोगत आहे मध्ये तर एक महिना हा विभागच बंद होता असे रूग्णातून ऐकायला मिळत आहे
{ नेत्र रूग्णांची केली मानसिकदैनिय अवस्था }
येथिल रूग्णालयातील नेत्र विभागत मोती बिंदू शस्त्र क्रिया करीता रूग्णांची तपासणी करीता वाबगाव ,तळणी ,भिडी,तांबा, बाभूळगाव,आकोली,विजय गोपाल ,अस्या अनेक ठिकाणावरून येथे वृद्ध रूग्ण नेत्र तपासणी करीता आले यात रूग्णांची तपासणी करून मोतीबिंदू असलेल्या १०ते १५ रूग्णांची निवड करण्यात आली त्यांना सेवाग्राम येथे शस्त्रक्रिया करण्याकरीता विभागा तर्फे २५ फेब्रूवारीला बूधवारला सकाळी १० वाजता बोलाविण्यात आले रूग्ण सर्व रूग्णालयात दाखल झाले तर नेत्र चिकीस्तकानी या रूग्णांची सर्वपरी तपासनी केली व रूग्ण नेन्याकरीता सेवाग्राम येथिल रूग्णवाहिका येणार रूग्ण सकाळ पासून रूग्णवाहीकीची ताटकळत वाट पाहतच राहिले दोन ते तिन वाजले तरी रूग्णवाहिका आलीच नाही सकाळ पासून वृद्ध रूग्ण उपास्यापोटी बसूनच पाहिलेले शेवटी काही रूग्ण बसस्थानक परिसरात हाॅटेलचा सहारा घेवून नास्था करीत होते व रूग्णालयात रूग्णावाहीका १० वाजता पासून आलीच नाही हि आपबिती सांगितली तेव्हाच आपले दै साहसिक प्रतिनीधी तेथे गेले तेथिल डॉ.व नेत्रचिकीस्तक यांची भेट घेतली व त्यांना रूग्णवाहिके बाबत विचारांना केली तेव्हा सर्वांनी फोन द्वारे संपर्क रूग्णवाहीकेसी केला तेव्हा रूग्णवाहिका ५-३० मिनिटांनी आली पन रूग्ण मात्र उपास्या पोटी रूग्णालयात रूग्णालयाचे उंबरठे झिजवत राहीले आता येईल थोड्या वेळानी येईल असेच उत्तरे रूग्णांना मिळत होती असी दैयनिय अवस्था होत असलेल्या रूग्णालयात कडे कोणत्याही लोकप्रतिनीधीचे वा संबंधित वरिष्ठ अधिका-यांचे लक्ष नसल्याने या रूग्णालयाला संध्या उतरती कळा लागली असून खाजगी रूग्णालये बल्ले बल्ले करीत आहे तर सामान्य गरिब रूग्ण मानसिक व आर्थिक विवेचणेत दिसून येत आहे याकडे आता तरी नवनिर्वाचित आमदार राजेश बकाणे यांनी लक्ष केंद्रित करावे असी मागणी होत आहे. (क्रमशः)

             राजू वाटाणे                         साहसिक News-/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!