एका चॅनल चा कथित पत्रकार समजणाऱ्या प्रमोद पानबुडे याचा महाप्रताप…..

0

हाच तो प्रमोद पानबुडे सभ्य महिलेविषयी व्हाट्स अँप वर अश्लील पोस्ट करणारा या प्रकरणी गुन्हा दाखल...

वर्धा -/ निर्लज्ज्म व्यक्ती सदा सुखी, असे अनेक व्यक्तींबाबत बोलले जाते. असाच निर्लज्ज्म व्यक्ती वर्धा शहरात एक पत्रकार म्हणून वर्धा शहरात वावरत आहे.पत्रकारितेचा रुबाब अंगीकारत प्रमोद पानबुडे हा पत्रकार सोशल मीडिया वर कधी कोणाच्या बहिणीची,तर कधी आईची इज्जत चव्हाट्यावर आणत आला आहे. पण आज त्याचा डाव फसला. वर्ध्याचे प्रतिष्ठित पत्रकार, साप्ताहिक वर्धा की बात चे मुख्य संपादक तथा वर्धा ब्लास्ट चॅनल चे प्रवर्तक योगेश मोखाडे यांच्याशी तो नेहमीच जाणून बुजून वाद करीत असतो. स्वतःला मोठा पत्रकार समजुन वरिष्ट पत्रकारांशी सुद्धा मुजोरी करण्याची त्याची सवय आहे. त्यातच आज त्याने हद्दचं पार करीत विल्सन मोखाडे यांच्या व्हाट्स अँप वर पोस्ट केली,त्या पोस्टमध्ये विल्सन मोखाडे यांच्या सुविद्य पत्नी बाबत अतिशय अपमानजनक पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर तात्काळ विल्सन मोखाडे संपूर्ण परिवारासह वर्धा शहर पोलीस स्टेशन गाठून विल्सन मोखाडे यांच्या पत्नी ने फिर्याद नोंदविली असता सदर प्रकरणी निर्लज्ज अश्या प्रमोद पानबुडे या पत्रकार विरोधात वर्धा शहर पोलिसांनी विनयभंगाच्या भारतीय न्याय संहिता नवीन कलम 79 अन्वये तात्काळ गुन्हा नोंदविला आहे.
निर्लज्ज प्रमोद पानबुडे याची नेहमीची सवय आणि निंदनीय कृत्यामुळे वडील श्यामरावजी पानबुडे जे वर्धा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय विश्राम गृहात कार्यरत होते त्यांनी या विकृत मानसिकतेच्या प्रमोद पानबुडे या स्वतः च्या मुलाला आपल्या संपूर्ण संपत्तीतून बेदखल करीत 15 वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिले.. तेव्हापासून हा बेवारसपने बाहेरच्या बाहेर आगाऊ च्या उचापती करीत जगत आहे. त्याने आजपावेतो अनेक महिलांशी गैरवर्तन केले असून काही महिलांची प्रचंड प्रमाणात आर्थिक फसवणूक सुध्दा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी अश्लील कृत्य करीत छेड काढल्याप्रकारणी त्याचेवर विनयभंगाचे अर्धा डझनभर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे कळते. एका चॅनल चा कथित पत्रकार समजणाऱ्या प्रमोद पानबुडे याचा महाप्रताप यावरून समोर आला असून एका पत्रकराच्याच पत्नी असलेल्या सभ्य महिलेविषयी व्हाट्स अँपवर अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.वर्धेतील समस्त पत्रकारांसह अनेक प्रतिष्टीत नागरिकांनी प्रमोद पानबुडे या पत्रकार ने सोशल मीडियावर वायरल केलेल्या अश्लील व निंदनीय पोस्ट बद्दल सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

साहसिक news -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!