एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशनला द्या!….

0

वर्धा-बल्लारशाह यात्री संघाकडुन खा. अमर काळे यांना निवेदन दिले.

हिंगणघाट -/ हिंगणघाट रेल्वे येथे एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा या करिता दि. 10 जुलै रोजी वर्धा-बल्लारशाह यात्री संघाकडुन खा. अमरभाऊ काळे यांचे हिंगनघाट येथील महावीर भवन मध्ये खासदार झाल्यानंतर प्रथम आगमन झाले व तिथे त्यांची भेट घेऊन अध्यक्ष राजेश अ. कोचर यांनी त्यांचे स्वागत केले व निवेदन देण्यात आले. वर्धा-बल्लारशाह यात्री संघाकडुन खा. अमर काळे यांना हिंगणघाट रेल्वे स्टेशन गाड्यांचा थांबा संबंधित चर्चा करून सविस्तर माहिती दिली.
वर्धा-बल्लारशाह यात्री संघ यांच्या नेतृत्वात गेल्या पाच वर्षापासून हिंगनघाट रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा मिळावा म्हणून भरपूर आंदोलने चर्चा बैठकी झाल्या परंतु हिंगनघाट रेल्वे स्टेशनला थांबा मिळत नसुन फक्त आश्वासन मिळतं आहे. कोविडच्या आधी हिंगनघाट रेल्वे स्टेशनला एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता. परंतु कोविड परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही गाड्याचा थांबा सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने फक्त आश्वासने आणि सहानुभूती पत्र दिले परंतु गाड्यांचा थांबा सुरू केला नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये मध्यस्थी घेऊन लवकरच गाड्यांचा थांबा सुरू करावा अशी चर्चा करण्यात आली. लवकरच प्रलंबित रेल्वे गाड्यांच्या थांबे पूर्ववत केले जातील व स्वतः रेल्वे मंत्र्यांसोबत व अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न लवकर मार्गी लावणार असे वर्धा-बल्लारशा संघाला खा. अमर काळे यांनी सांगितले. अमृत भारत योजनेंतर्गत स्थानकावर सुरू असलेली विकासकामे जलद गतीने करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या निवेदनात बल्लारशाह-मुंबई, बल्लारशाह-पुणे ट्रेन दररोज सुरू करावी, काजीपेट-पुणे ही एक्सप्रेस साप्ताहिक आहे तीला रोज सुरू करण्यात यावे, भुसावळ-वर्धा मेमो पॅसेंजर बल्लारशाह पर्यंत वाढवावी, नागपूर माजरी-आदिलाबाद पॅसेंजर सुरू करावी, अजनी-काजीपेट पॅसेंजर सुरू करावी आणि कोरबा, इंदौर, रायपूर, जोधपूर, हिसरा (बिकानेर), धनबाद-कोल्हापूर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा अप आणि डाऊन रेल्वे थांबा हिंगणघाट रेल्वे स्टेशन देण्यात यावा, हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विविध मागणीचे निवेदन वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे अध्यक्ष राजेश अ. कोचर, सचिव डि.के. गुरनुले, दिलीप बालपांडे, मो. शहजाद आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!