🔥एनसीसी प्रशिक्षणातून सैनिकी व्यक्तिमत्व विकसित होते,कर्नल जीसांतो.🔥महाविद्यालय एनसीसीचा १५ वा वर्धापन दिन संपन्न.
देवळी -/एनसीसी ही सैन्य दलाची दुसरी फळी असून यातून तरुण तरुणींमध्ये देशभक्ती,कर्तव्यनिष्ठता, जागरूकता व नैतिक मूल्याच्या विकास घडवून आणला जातो.एन सी सी च्या विविध प्रशिक्षणातून तथा शिबिरातून सैनिकी मानसिकता तयार केली जाते. देशाच्या सुरक्षेकरिता सैनिकी मानसिकता असणे गरजेचे आहे. म्हणजेच एनसीसी प्रशिक्षणातून सैनिकी व्यक्तिमत्व विकसित होते’, असे प्रतिपादन(21)महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमान अधिकारी कर्नल जीसांतो यांनी स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाच्या १५ व्या एनसीसी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 23 जानेवारी रोजी केले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे शेवटचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129 व्या जन्मदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयाचा एनसीसी दिवस संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समाजसेवक तथा उद्योजक मोहनबाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून 21 महाराष्ट्र बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल जीसांतो, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, देवळीचे पोलीस ठाणेदार अमोल मांडलकर, माजी एनसीसी अधिकारी कॅप्टन दिलीप ठोंबरे, सृजन कॉन्व्हेंटच्या अध्यक्षा डॉ.श्रद्धा चोरे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.सुनिता सोनारे,पत्रकार सत्तार शेख,समीर शेख,गणेश शेंडे,संतोष सुरक,प्रा.डॉ. प्रभाकर ढाले,डॉ.रफिक शेख,प्रा. विवेक देशमुख व (NCC) अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेताजी सुभाषचंद्र बोस व यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी एनसीसी छात्र सैनिकांनी शानदार सेरेमोनियल परेड सादर केली. सदर परेडचे नेतृत्व सीनियर अंडर ऑफिसर कल्याणी लिखार व अंडर ऑफिसर रितेश बुटे यांनी केले तर बॉम्ब स्पोट प्रसंगात एनसीसी छात्रसैनिकांची भूमिका यावर सादर करण्यात आलेले चित्त थरारक प्रात्यक्षिक सार्जंट सौरभ साव याच्या नेतृत्वात सादर करण्यात आले. महाराष्ट्राचे लोक नृत्य यावेळी रेंजर लीडर समीक्षा नेवारे व कल्याणी लिखार यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले
एनसीसी दिनानिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत सृजन कॉन्व्हेंट, यशवंत कन्या विद्यालय व गुरुकुल इंग्लिश कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. ज्यात वर्ग पाचवी ते सातवी च्या ‘गट अ’ मध्ये सृजन इंग्लिश स्कूलची वंशिका पारिसे, गुरुकुल विद्या निकेतनची स्वरा अलोणे व सुजन स्कूलची श्रेया तेलरांधे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आली. वर्ग ८ ते १० ‘गट ब’ करीता ‘पर्यावरण संवर्धन: या विषयावर सृष्टी ठाकरे, रचना अमबहारे व मृणाल चौधरी यांना तर महाविद्यालयीन गटांकरिता स्वाती खोड ,प्राची उईके व श्रद्धा मानले यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात आली. प्रत्येक गटात दहा प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन ३० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी एनसीसी विभागातर्फे देवळीचे उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व मोहनबाबू अग्रवाल, माजी एनसीसी अधिकारी कॅप्टन दिलीप ठोंबरे व डॉक्टर श्रद्धा चौरे यांना ‘एनसीसी सन्मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त देवळी तालुका प्रतिनिधी सत्तार शेख, समीर शेख, गणेश शेंडे, संतोष तुरक ,अजिज शेख यांना (NCC) सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
पहिल्या राष्ट्रीय रोव्हर रेंजर जांबोरीत महाराष्ट्र चमुने उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे व रोव्हर लीडर संतोष तुरक यांना राष्ट्रीय चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर अंडर ऑफिसर आदर्श नाईक व मनोज नेहारे यांना दिल्लीत संपन्न झालेल्या डायमंड जुबली शिबिराचे चषक प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालक अंडर ऑफिसर कोमल शितळे हिने केले तर आभार एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी मानले. यशस्वीते करिता सुजल पराते, निशांत शितळे, उदय काळे, युवराज डफरे, पुनम डांगरे, पायल चौके,वैष्णवी कन्नाके, स्नेहा मडकाम,यांच्यासह एनसीसी छात्र सैनिकांनी अथक परिश्रम केले.
कार्यक्रमाची सांगता ‘हम सब भारतीय है……….’ या एनसीसी गीताने झाली.