एमजीआयएमएस, युनिसेफ आणि आरंभ टिम मुबई ची कारंजा तालुक्यातील सारवाडी बिटमधील बोटोणा येथे आयोजित पालक मेळाव्यात उपस्थिती….

0

कारंजा -/ तालुक्यातील सारवाडी बिटमधील बोटोणा येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.0- 3 वयोगटासाठी ..आरंभ उपक्रमाच असून त्या अंतर्गत गरोदर, स्तनदा व तीन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी खेळ, कृती, संवादाचे विविध उपक्रम असून त्यातून बालकांच्या विकासाचे टप्पे सुकर होत असतात.समुदायापर्यंत पोहचण्यासाठी काही तंत्राचा उपयोग करावा लागतो.आरंभ अंतर्गत देखील गृहभेटी, पालकसभा व पालकमेळाव्याच्या माध्यमातून सकारात्मक जनजागृती होणे आवश्यक असते, जेणेकरून अपेक्षित बदल होऊन समुदाय वर्तणुक बदलासाठी त्याचा उपयोग होईल.25 जुलै रोजी एमजीआयएमएस,युनिसेफ आणि आरंभ टिमने महीला बालकल्याण जि.प. वर्धा अंतर्गत आकांक्षित तालुका कारंजा सारवाडी बिटमधील बोटोणा येथे आयोजित पालक मेळाव्याला भेट दिली. एकांबा या अंगणवाडीत प्रत्यक्ष उपस्थित राहून रेखा नाईक अंगणवाडी सेविका , मदतनिस रूपाली नागपुरे यांनी घेतलेल्या पालक सभेचे निरिक्षण नोंदविले. बोटोणा येथील अंगणवाडी सेविका सुनिता नेहारे, अश्विनी ठाकरे यांनी प्रत्यक्षात घेतलेल्या गृहभेटीचे निरिक्षण केले. प्रत्यक्षात क्षेत्रिय स्तरावर होत असलेल्या नियोजनपुर्ण कामाचे मान्यवरांनी मुक्तकंठाने कौतुक करून शाबासकी दिली.पालकमेळाव्याला मा. संजीव सिंग चिफ फिल्ड ऑफीसर युनिसेफ, मा. राजलक्ष्मी नायर न्युट्रिशन एक्सपर्ट युनिसेफ , मा. शर्मिला मुखर्जी युनिसेफ कंन्सलटंट,मा.आनंद,मा. मंगेश युनिसेफ,मा.सुबोध गुप्ता,डॉ. अभिषेक राऊत,अमृता बांदल,आरंभ टिमचे राज बसेकर,सोनाली,मंदा, सविता,मेघा,सम्राट,पुनम,गौरव, आयसीडिस कारंजा,पं.स. कारंजा श्रीमती मानकर, राऊत, जाधव, प्रगती जगताप यांनी मेळाव्याला भेट देऊन स्टॉलवर उपस्थित ताईकडून माहीती जाणून घेतली ताईंनी आत्मविश्वासाने सर्व माहीती त्यामागील कारणमिमांसा स्पष्ट केली. मा. संजीव सर, राजी मॅम, शर्मिला मॅम यांनी सेविका मदतनिस यांचे काम प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. सर्व मान्यवर मंडळींनी मेळाव्यातील खेळ कृतीचा आनंद घेतला. उपस्थित माता पालक, बाबा पालक,आजी, आजोबा व कुटुंबियांशी मुक्तसंवाद साधला.एकंदरीत आरंभ प्रशिक्षणे,अंगणवाडी ताईंची असलेली तयारी,गृहभेट,पालकसभा आणि पालकमेळाव्यातून आरंभ घराघरापर्यंत पोहचत असल्याचे आशादायी चित्र समुदाय वर्तणुक बदलासाठी उपयुक्त असून बालविकासाला गती मिळेल असा आशावाद युनिसेफ टिमनी व्यक्त केला. दरम्यान समुदाय सहभागासाठी शिलवंत ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कौतुक ही अशी संजिवनी असून जी सकारात्मक काम करायची उर्जा निर्माण करते. क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष काम माझी अधिनस्त यंत्रणा करीत असून आज दिसणाऱ्या चित्राच्या खऱ्या अर्थाने शिल्पकार माझ्या अंगणवाडी ताई व मदतनिस असल्याचे प्रांजळ मत ललिता आसटकर कि ट्रेनर आरंभ यांनी व्यक्त केले.

साहसिक news -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!