एस एम डब्लू इस्पात मधील आठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल….
दोन मजुराच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी हीच ती(S M W) संगम स्टील इस्पात कंपनी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा झाला दाखल.
एकास अटक दोघांना चौकशी करण्याकरिता घेतले ताब्यात..
देवळी -/औद्योगिक वसाहतीमध्ये एस एम डब्ल्यू इस्पात मध्ये दोन युवकाचा अकस्मात मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करून कंपनी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठेकेदारास अटक करण्यात आली आहे.व दोन अधिकाऱ्यांना तपासाकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.गुन्हा दाखल झालेल्या मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक बिंदल,मनु जॉर्ज,आशिष भट,ब्रिजेश यादव,श्याम मुंदडा,रमेश नाथ,प्रसाद कुपेकर,व ठेकेदार हर्षल गायकवाड यांचा समावेश आहे.अकस्मात मृत्यूमध्ये रितिक प्रकाश कामडी वय १७ वर्ष रा. देवळी हा कंपनीमध्ये काम करीत असताना प्रकृती बिघडल्याने सावंगी येथे रुग्णालय मध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाला.मृतक हा ठेकेदार हर्षल गायकवाड याच्याकडे एस एम डब्ल्यू कंपनीमध्ये कामावर होता सदर मृतक हा अल्पवयीन असल्याने त्याला क्षमतेपेक्षा जास्त अवजड काम लावल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची फिर्यादी प्रकाश अशोक कामडी याच्या लेखी तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास हाती घेतला.चौकशीमध्ये कंपनीचे अधिकारी व ठेकेदार हे मृत्यूला कारणीभूत असल्यावरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.त्याचप्रमाणे दुसरा मृतक अमित प्रमोद मातकर वय २१ वर्ष रा.देवळी हा सुद्धा कंपनी कामावर होता आणि भोवळ आल्यामुळे त्याला सुद्धा दवाखान्यात दाखल करण्यात आले होते याचाही मृत्यू झाला.याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून पुढील चौकशी सुरू आहे.एस एम डब्ल्यू इस्पात कंपनीमध्ये यापूर्वी अपघाताच्या अनेक घटना घडल्या असून कामगार मृत्युमुखी पडले आहेत पण मृतकांना कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही व अनेक प्रकरणे दडपल्या गेलेली आहे.पण यावेळी देवळी येथील कामगार असल्यामुळे प्रकरण चव्हाट्यावर आले मृतकाच्या नातेवाईकाने चौकशीची व गुन्हा नोंदणीची मागणी केल्यावरून दक्ष पोलीस अधिकारी,विभागीय पोलीस अधिकारी,राहुल चव्हाण यांनी गंभीर दखल घेऊन चौकशीचे सूत्रे आपल्या मार्गदर्शनाखाली राबवून गुन्हा दाखल करण्यास पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात आली ठाणेदार सार्थक नेहते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवून तपास हाती घेतला आहे. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये माजली असून गुन्हे दाखल झालेल्यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले असून यातील काही कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन समोर गोळा होऊन धावपळीचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले.
(क्रमशः)
