वर्धा -/ ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा च्या वतीने युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सोबतच एक पेन एक वही महापरिनिर्वाणदिनी लोकांनी समता सैनिक दलाला दान करावी. उद्देश हा की दान झालेले नोटबुक पेन गरीब व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तथा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून नोटबुक व पेनाचे वाटप करणे तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य देणे . ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने रक्तदान शिबिर व डोनेट एक पेन व एक नोटबुक या उपक्रमाचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक जितिन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांचे हस्ते पार पाडले. त्यांनी रक्तदान सुद्धा केले. याप्रसंगी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रातील पैलूवर भाष्य केले . यावेळी जितीन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत समता सैनिक दलाच्या सैनिकांनी सिव्हिल लाईन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली व प्रतिज्ञेचे वाचन केले. 52 लोकांनी रक्तदान केले. ज्येष्ठ नागरिक सावंगी मेघे , थुल परिवार व इतर लोकांनी साडेचारशे नोटबुक व 300 पेन दान दिली. यावेळी ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धाचे विदर्भसचिव रमेश निमसडकर, महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य अनिल खडतकर, जिल्हाध्यक्ष राहुल नगराळे, जिल्हा सचिव आशिष मेश्राम, जिल्हा सहसचिव आशिष रत्नमाला नरेश लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष नूरुल तडसे, महाराष्ट्र राज्य कार्यकारी सदस्य आरती निमसडकर, जिल्हा उपाध्यक्ष सरिता कुसळे, जिल्हा बौद्धिक प्रमुख डॉ. माधवी पाटील ,जिल्हा मार्गदर्शक सुनील बाभळे , जिल्हा कार्यकारी सदस्य हर्षल गजभिये मयुरी पंधराम, तालुका बौद्धिक प्रमुख जीवनप्रकाश निमसडकर, विधी सल्लागार एड. कपिलवृक्ष गोडघाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र रत्नबोधी व मानवंदनाचे पथसंचलन तालुका प्रशिक्षक दिलीप तागडे यांनी केले व आभार अनिल खडतकर यांनी मानले.