ओंजळ बहुउद्देशीय संस्थेत स्त्री अत्याचार थांबविण्या बाबत आगळ्यावेगळ्या थीम मध्ये गणेशाची स्थापना….

0

बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुनसर्वांचा लाडका गणाधीश म्हणजेच गणपती…..!

वर्धा -/ गणपतीच्या आगमनाची सर्व भक्तांनाच ओढ असते.कारण सर्व कामाची सुरुवात गणपतीच्या पुजनानेचं होते.तीचं ओढ दरवर्षीप्रमाणे औंजळ बहुउद्देशीय संस्थेणी पण केली आहे.त्या उत्साहाने संस्थेतील सर्व विद्यार्थी व सदस्य बाप्पाच्या आगमनाकरिता विविध रंगीबेरंगी पर्यावरणपूरक सजावट करण्यासाठी खूप आतुर असतात.सर्वांना माहितीचं आहे की,औंजळ बहुउद्देशीय संस्था ही सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत तर आहेचं परंतु,दरवर्षी ओंजळ बहुउद्देशीय संस्था ही गणपतीची स्थापना सामाजिक उपक्रमाद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात.कारण औंजळ बहुउद्देशीय संस्थेला १० वर्षापासून गणपती स्थापनेची परंपरा आहे.विशेष म्हणजे दरवर्षी गारीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.आणि त्याच मूर्तीची वर्षभर दररोज नित्यनेमाने पुजा केली जाते.संस्थेतील सदस्य आपल्या कलागुणांच्या आधारावर सजावट करतात,वेगवेगळ्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो.यावर्षी स्त्रियांवरील होणार्‍या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच सर्व स्त्रिया हक्काने जगू शकल्या पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून स्त्री भ्रूणहत्या,बलात्कार ,अत्याचार,हिंसा व महिलांना योग्य न्याय मिळाला पाहिजे याबाबत सत्य परिस्थिती थीम च्या माध्यमातून रेखाटली आहे.यासाठी थीम तयार करुन वर्तमानकाळातील पिढीला जागरूक करण्यासाठी असा संदेश देतो आहे की,आजची स्त्री ही ठामपणे जगासमोर उभी राहिली पाहिजे व आयुष्यात येणार्‍या संकटांना तोंड देण्याचे धाडस तिच्यामध्ये असायला हवे.परंतु भारतामध्ये 21व्या शतकामध्ये सुद्धा आजची स्त्री ही सुरक्षित नाही,कोलकत्ता बदलापूर ,निर्भया,अशा विविध लैंगिक अत्याचार व बलात्कार घटना समोर येत आहे,याच घटनेला वाचा फोडण्यासाठी व त्याच्या झालेल्या महिलांना न्याय मिळावा म्हणून ओंजळ बहुउद्देशीय संस्थेने गणपती स्थापनेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत उपक्रम राबवला.तसेच आज ज्याप्रकारे भारत हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश बनला आहे, त्यादृष्टीने नजीकच्या भविष्यात भारतानेही महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्याची गरज आहे.तसेच सर्व गणेश भक्तांना असे आव्हान आहे की आपण सुद्धा दरवर्षी दारीच्या मूर्तीची स्थापना करावी व नदीमध्ये नविसर्जित करता मनोभावे वर्षभर पूजा करावी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे तरी सर्व वर्धा जिल्ह्य़ातील सम्माननीय नागरिकांना विनंती आहे की,चिमुकल्यांनी बनविलेल्या कलाकृतीला वाव देण्याकरिता अवश्य भेट द्यावी.त्यासाठी ओंजळ बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कु. प्राजक्ता पुरुषोत्तम मुते ह्या चिमुकल्यांना नेहमी प्रोत्साहित करून नवनवीन उपक्रमांना चालना देण्याचे काम करत असतात… चिमुकल्यांनी केलेल्या या उपक्रम कृतीचे सर्वत्र करण्यात आणि कौतुक करण्यात येत आहे.त्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा कु प्राजक्ता मुते यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व जनतेला असे आवाहन केले आहे की,बिना खर्चीक गणपती बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन व चिमुकल्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी एकदा नक्की भेट द्यावी.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!