औरंगपूर व चाकूर घाटातून हजारो ब्रास रेतीचोरी करणाऱ्या संदीप सोनटक्के ला अभय कोणाचे….

0

🔥औरंगपूर व चाकूर घाटातून हजारो ब्रास रेतीचोरी करणाऱ्या संदीप सोनटक्के ला अभय कोणाचे.🔥हाच तो रेती माफिया संदीप सोनटक्के याला. 🔥चाकूर व औरंगपूर घाट परिसरातून जेसीपी लावून संपूर्ण नदी पात्रातून काढली संदी-प सोनटक्के याने रेती.

🔥सेलू तहसिदार यांनी या रेतीचोराची गाडी पकडताच महसूल अधिकाऱ्याला केली दमदाटी.

🔥पावसाळा संपल्यापासून सिंदी (रेल्वे) येथील संदीप सोनटक्के याने ४०० ट्रक व ट्रॅक्टर रेती चोरल्याचा गावकऱ्याचा आरोप.

🔥रेतीतस्कर संदीप सोनटक्के हा समुद्रपूर तहसिलदार, एस.डी.ओ. हिंगणघाट यांनाही दाखवते वाकुल्या

🔥स्वतःला हा रेतीतस्कर ‘डॉन’ समजत असून मागील अनेक वर्षापासून रेतीचोरीच्या धंदयात सक्रिय

सिंदी (रेल्वे) -/ येथून जवळच असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील औरंगपूर व चाकूर या नदी घाटातून मागील ४ ते ५ वर्षापासून रेती चोरीच्या धंदयात सक्रिय असलेला संदीप सोनटक्के हा सध्या महसुल प्रशासनाला न भिता दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात रेती चोरी करीत असल्याचा जबळ पुरावा दै. साहसिक व साहसिक न्यूज-२४ च्या हाती लागला आहे.१५ दिवसापूर्वी सेलू तहसिलदार यांच्या टिमने संदीप सोनटक्केचा रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडला होता. सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी तहसिलदार यांचे टिमवर दबाव टाकून जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्याचा आग्रह करीत होता. शेवटी तहसिलदार यांचे टिमनी न घाबरता सिंदी (रेल्वे) पोलीसात तक्रार दाखल केली. यावरून सिंदी (रेल्वे) पोलीसांनी शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय अधिकारी यांना धमकविणे या कलमा खाली गुन्हे दाखल करून अटक केली. तरी सुद्धा या रेतीचोराचा धंदा बंद झाला नाही. चाकूर व औरंगपूर या घाटातून आजही दिवस-रात्र हा ‘संदीप’ रेतीचोरी करीत आहे. याने चक्क नदीपात्रातून रस्ता बनविला आहे. तसेच रेतीचे साठे करून ठेवले आहे. याचा संपूर्ण पुरावा तहसिलदार कपील हटकर व एस.डी.ओ. हिंगणघाट यांना पोहचला आहे. याने आतापर्यंत ४०० ट्रॅक्टर व टिप्पर रेतीची चोरी केली असून लाखो रुपयाची अवैध माया जमविली आहे. दिवस-रात्र रेती चोरी करणाऱ्या या संदीप सोनटक्के नावाच्या चोराला तहसिलदार समुद्रपूर यांनी घाटावर जावून ईटीएस मोजणी करून दंड आकारावा अशी मागणी जनतेनी केली आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!