कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार…..

0

 वर्धा नागपूर मार्गावरील खडकी जवळ घडला अपघात..
वर्धा-/ नागपूर महामार्गावर असलेल्या खडकी येथील पेट्रोलपंपजवळ रची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.ही घटना आज दि. ३ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली .
सागर अनिल शिंदे वय ३२ वर्ष रा.मोहि असे मृतक युवकाचे नावं असून ब्राम्हणी येथील आडे परिवारातील लग्नाकरिता खडकी येथे गेला होता. मृतक हा खडकी वरुन ‌ सेलू कडे आपल्या दुचाकी क्र. एम.एच ३२ ए.एल ०९९२ ने परत येत असताना समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रेलर क्र. एम एच ४० ए.के.२२९५ ने जबर धडक दिली.यात कॅन्टेनरच्या मागील चाकात आल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर
ट्रेलरचालकाने घटना स्थळावरुन ट्रेलर सहित पळ काढला. मृतकाचा चेहरा विद्रुप झाल्याने ओळखू येत नव्हता. परंतू.नातेवाईकाकडून मृतकाची ओळख पटली.अपघात होताच नागरिकांनी घटनेची माहिती सिंदी रेल्वे पोलीसांना दिली. व सोबतच १०८ रुग्णवाहिकेलाही बोलावून ‌ घेतले. मृतकाचा चेहरा विद्रुप असल्याने सुरवातीला चालकाने प्रेत नेण्यास विरोध केला. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पोलिसांनी जमावाशी असभ्य वागणूक केल्याने नागरीकांनी रोष व्यक्त केला.मृतकास शवविच्छदनाकरिता सेलूच्या ग्रामीण रुग्णालायात दाखल केले.

सागर वैद्य साहसिक न्यूज -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!