कराटे बेल्ट परीक्षेत ब्ल्यू बेल्ट घेऊन अनन्या ठाकूर विजय
प्रतिनिधी / देवळी :
कराटे या खेळातून कणखरपना धाडसी मनोवृत्ती समयसूचकता व ध्येयप्राप्ती निर्माण होत असते पालकांनी अशा प्रकारचे उपक्रम आपल्या मुलांना मोठ्या प्रमाणात सहभागी करावे कारण अडचणीवर मात करणारे जीवनात यशस्वी होत असते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल यांनी व्यक्त केले.त्यावेळेस देवळी येथील श्यामसुंदर अग्रवाल सभागृहात लॉयन्स ट्रॅडिशनल शोतोकान कराटे जे असोशियन इंडिया ब्लॅक कमांडो मार्शल आर्ट असोशियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सिंहान आणि उल्हास वाघ,सेन्साई अनुप कपूर,सेन्साई अमोल मानकर,सेन्साई साहिल वाघ, सेन्साई धनंजय कपूर,प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच कराटे बेल्ट परीक्षेत ब्ल्यू बेल्ट मधील अनन्या सुरज ठाकूर या विद्यार्थिनींनी ब्ल्यू बेल्ट ची विजई प्राप्त केली आहेत. तसेच त्यावेळेस विद्यार्थी प्रांजली बोरकुटे,कृपा देशमुख,गौरव ढोकणे, सत्तेशी दुर्गे,वेत खुर्जेकर,दैविक गिरडकर,रोहित चिकाटे,प्राची काटे, आधी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे संचालन अमोल मानकर यांनी केले.तर आभार धनंजय कपूर यांनी मानले कार्यक्रमात आकाश कापसे,सुरेश गांडोले, उपस्थित होते.तसेच अनन्या सुरज ठाकूर या विद्यार्थिनींनी ब्ल्यू बेल्ट कराटे परीक्षांमधील विजई प्राप्त झाली असून सुरज ठाकूर यांच्या कुटुंबातील आनंद व्यक्त होत आहे.