कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न…..

0

समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करणारी पिढी घडवणे गरजेचे : ऍड.विजयसिंह ठाकूर.

वर्धा -/ कुठलाही खेळ आणि त्याच्या नियमित सराव त्या व्यक्तीचे शरीर आणि मन सुदृढ ठेवते.मात्र कराटे या क्रीडा प्रकारात या व्यतिरिक्त सुरक्षितता आणि चपळता खेळाडूंना लाभते.तरुण-तरुणींना स्वतःची सुरक्षितता आणि व्यक्तिमत्व विकासासाठी या खेळात मोठ्या प्रमाणात सहभागी करणे आवश्यक आहे.या खेळामुळे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगणारी पिढी घडण्याचे कार्य सिद्धीस जाते असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ऍड. विजयसिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.ते रामनगर येथील उत्कर्ष उद्यान येथे गुरुवार दिनांक 6 जून रोजी स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडिया द्वारा संचालित स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा द्वारा आयोजित कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी स्पोर्ट कराटे असोसिएशनचे वर्धा जिल्ह्याचे संरक्षक इमरान राही, वर्धा नगरपरिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ वंदनाताई भुते, संस्थेचे उपाध्यक्ष मोहन मोहिते, संचालक सभासद प्रकाशजी खंडार,भगवानदास आहुजा, शेखर भागवतकर, रामनगर येथील संत तुकाराम मंदिर चे सचिव ज्ञानेश्वरराव हिवसे, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधर पाटील, असोसिएशन सभासद प्रवीण पेठे, सचिन झाडे, माजी नगरसेवक लखनसिंग ठाकूर, समाजसेवक विनोद टावरी, राजू लभाने व इत्यादी मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिहान मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनात रामनगर शाखा प्रशिक्षक सेन्साई यांनी पूजा गोसटकर यांनी केले. संचालन सौ कल्याणी भोंगाडे तर आभार सेम्पाई पलक लक्षणे यांनी मानले.
मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ब्लॅक बेल्ट भार्गव खेवले, पर्पल बेल्ट तीर्थ दरणे, शरयू येगडे, स्वानंदी सुरकार, ब्ल्यू बेल्ट रुजान बागमोरे, निल नेहारे, ग्रीन बेल्ट मानवी राठोड, कृतिका तपासे, रेहान अन्सारी, क्रिजल नेहारे, माही राठोड, ऑरेंज बेल्ट प्रतीक कन्नाके, तृष्णा सोनुणे, रोशन येरणे, समीक्षा म्हैस्कर, इच्छा वैरागडे, अर्णव कायरकर, तर येलो बेल्ट करिता रिद्धीमा रामटेके, गुरुमीत देवताळे, नुजहत अन्सारी, मानव कडू, अदविका इंगळे, रुद्रांश काळे व इत्यादी विद्यार्थ्यांना कराटे बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता तेजस निवल, नेहा गोल्हर, प्रथमेश धाबरडे, अवंतिका तपासे, डॉ. जितेंद्र खेवले, पुष्पाताई तपासे, तसलीम अन्सारी, मानव कडू, रंजना उमेश दरणे, सौ हेमा राठोड व इत्यादी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे माता पिता व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!