🔥भाजपा उमेदवार पंकज भोयर यांच्या पत्नी शितल भोयर पैसे वाटप करीत असल्याचा काँग्रेसचा दावा.
वर्धा -/ येथील बोरगाव मेघे परिसरात आज दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी बोरगाव मेघे परिसरात भाजपा उमेदवार पंकज भोयर यांच्या पत्नी शितल भोयर एका कार्यकर्त्यांच्या घरी प्रचार करीत होत्या त्यांच्यासोबत माझी नगरसेवक सतीश वैद्य प्रचार करीत होते.यावेळी बोरगाव मेघे येथील माजी पंचायत समिती चे काँग्रेसचे सभापती मनोज चौधरी यांना माहिती पडताच ते प्रचार करीत असलेल्या घरी जाऊन भाजपा पक्षाचे कार्यकर्त्यांना जवाब विचारला की,प्रचार करण्याची वेळ तर 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता पर्यंत होती. आणि आपण 19 नोव्हेंबर रोजी प्रचार करीत असून मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.परंतु हेच प्रकरण वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले.भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा खरंच जबरीने घुसल्याची तक्रार दिली. यामुळे शेवटी” तेरी भी चुप मेरी भी चुप ” म्हणत भाजप व काँग्रेसचे उमेदवारांनी तक्रारी परत घेतल्या. वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये शेकडो मतदार जमा झाले होते.