🔥कुंभारपुरा प्रभागातील कुप नलिका सहा महिन्यापासून बंद,घाणीच्या विळख्यात.🔥आष्टी नगर पंचायत चा कार्यभारा विरोधात नागरिक आक्रमक.
आष्टी शहीद -/आष्टी नगर पंचायत च्या हद्दीतील वार्ड क्रमांक 1 कुंभारपुरा येथील कुपनलिका गेल्या सहा महिन्या पासून बंद असल्यामुळे व शेजारी साहित्य टाकून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले म्हणून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सविस्तर असे
आष्टी नगर पंचायत च्या हद्दीत वार्ड क्रमांक 1कुंभारपुरा आहे. या प्रभागात असलेली कुप नलिका गेल्या सहा महिण्यापुर्वी अचानक बंद पडली त्यामुळे त्यातून पाणी मिळणे बंद झाले. कुप नलिका दुरुस्त करावी म्हणून अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी केल्या मात्र नगर पंचायत ने याकडे साफ दुर्लक्ष केले. आष्टी शहरात एक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मुख्य टाकी बंद केल्याने आष्टी शहराचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. शेजारी दोन टाक्यातून पाणी सोडण्यात येत असले तरी शहरात आता एक दिवसा आड पाणी येत आहे. पाणी आणायचे कोठून म्हणून या कुंभारपुरा प्रभागात नागरिक आक्रमक झाले आहेत. येथे सार्वजनिक विहिरी नसल्याने पाणी टंचाई निर्माण होते. कुप नलिका तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्य अधिकारी नगर पंचायत यांचे कडे लेखी निवेदन देऊन केली आहे.निवेदनावर मीना डोईफोडे, विजय सावरकर, शरद सावरकर, रमेश इंगळे, प्रवीण कांदे, मंगेश इंगळे, पंकज पिहूल, राजेश माहोरे, राहुल गुल्हाने, खालील खा, मिलिंद पिहूल यांच्या सह्या आहेत.