🔥पहिल्या दिवशी 720 क्विंटलची खरेदी. 🔥सोयाबीनला 4275 रुपये प्रति क्विंटल दर.
सिंदी (रेल्वे) -/ कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी (रेल्वे) येथे सोमवारी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या शुभमुहूर्ताप्रसंगी सभापती केसरीचंद खंगार, सचिव महेंद्र भांडारकर, संचालक गोपाल कोपरकर, धनराज झिलपे, इस्राईल सुफी, प्रमोद डकरे, स्वप्नील तोटे, नितीन कोहाड, मुकेश ढोक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी सर्वप्रथम सभापती केसरीचंद खंगार यांच्याहस्ते वजन काट्याचे विधिवत पूजन करून सोयाबीन विक्रीसाठी आलेले विनोद मदनकर, संदीप सोनटक्के, संदीप दिवटे यांच्यासह 10 शेतकऱ्यांचा यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पहिल्याच दिवशी जवळपास 720 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून पहिल्या सोयाबीनच्या ढेरीला 4275 रुपये इतका प्रति क्विंटल दर देण्यात आला. शेतीमालास स्पर्धात्मक बाजारभाव मिळावा यासाठी खरेदीदार / निर्यातदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्यावर बाजार समितीचा भर राहणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल परस्पर शिवार खरेदीद्वारे विक्री न करता योग्य प्रतवारी करून शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या अधिकृत बाजार आवारातच शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगार यांनी केले.