केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुतण्या सांगून राजन शहा वर्धा जिल्ह्यात करतो अवैध व्यवसाय
- प्रतिनिधी/वर्धा
‘सध्या जिल्ह्यात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ श्रीमंत लोकांसाठी जिल्हा प्रशासनांनी वेगळा कायदा केला असून गरिबांसाठी वेगळा कायदा करण्यात आला आहे. एखाद्या सामान्य माणसाने घर बांधकामाची परवानगी घेतली नाही तर त्याच्यावर कारवाई केल्या जाते. तर दुसरीकडे माजी खासदार दत्ता मेघे, माजी आ. सागर मेघे, आ. समीर मेघे यांनी कोणतीही शासनाची पूर्व परवानगी न घेता 45 इमारतीचे अवैध बांधकाम केले आहे. सदर इमारतीची नोंद सुद्धा ग्रा.पं. ला नाही. तक्रार कर्त्यांनी कितीही तक्रारी केल्या तरी ‘मेघे’ यांच्या पैशाच्या मोह जाळ्यात अधिकारी अडकतो आणि त्यामुळे कारवाई करीत नाही. अशीच दुसरी घटना गर्भ श्रीमंत असलेले रेस कोर्स मुंबई चे मालक कांतीलाल शहा यांचे चिरंजीव राजन शहा यांचे उदाहरण देता येईल. जे.पी. इंटरप्राईजेस मुंबई या कंपनीचे संचालक कांतीलाल शहा व राजन शहा हे बापलेक असून शासनाचे कोणतेही काम बिलो मध्ये घेऊन कोट्यावधी रुपयांची कामे घेण्यात येऊन अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पेटी कंत्राटदाराच्या माध्यमातून केल्या जातात. संबंधित अधिकाऱ्यांना मुंबईच्या रेसकोर्स कोर्टाची हवा दाखवली की संबंधित अधिकारी राजन शहाच्या पायाच पडतो. वर्ध्यातील शिवाजी चौक ते जुनापाणी या कामाचे कंत्राट राजन शहा यांना मिळाले होते 35 कोटीच्या या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या कामावर सिमेंट टाकण्यासाठी मागील 2 वर्षांपूर्वी राजन शहा याने मौजा पांढरकवडा येथे शेत सर्वे क्र. 6 क्षेत्र 1 हैक्टर 26 आर हे खरेदी केले. याठिकाणी वाणिज्यक वापर सुरू केला परंतु सदर जागेचा अकृषक आदेश आजही केला नाही. पांढरकवडा येथील शेतकऱ्यांनी होणारे प्रदूषण व धुळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी तहसीलदार, एस.डी.ओ. जिल्हाधिकारी वर्धा यांना करण्यात आल्या परंतु आजपर्यंत जिल्हा प्रशासनानी या रेसकोर्सच्या घोड्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पांढरकवडा येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून उमरी (मेघे) येथील तलाठी यशवंत लडके यांनी दि. 2 /11/ 2018 रोजी तहसीलदार वर्धा यांना पत्र देऊन मौजा पांढरकवडा येथील शेत सर्वे क्रमांक 6 क्षेत्र 1 हेक्टर 26 आर हे राजन कांतीलाल शहा यांच्या नावाने दर्जा आहे. सदर शेतामध्ये अंदाजे 2 महिन्यापूर्वी पासून मिक्सिंग प्लांट उभारून अकृषक वापर सुरू केलेला आहे. अकृषक आदेशाबाबत संबंधितास विचारणा केली असता त्याच्याकडे अकृषक परवाना नसल्याचे आढळून आले.
सदर प्लांटचे धूरामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर प्लांट करिता सदर शेतामधील विहिरी व बोरवेल मधून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असल्यामुळे आजूबाजूच्या सिंचन विहिरीचे पाण्याचे पातळीवरही दुरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे स्वयंमस्पष्ट अहवाल एक नव्हे तर दोनदा तलाठी यांनी दिल्यानंतरही आजपर्यंत केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या नकली पुतण्या राजन कांतीलाल शहा विरोधात फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याची हिंमत आजपर्यंत जिल्हाधिकारी एस.डी.ओ. तहसीलदार यांच्याकडे राहाली नाही.