केदारेश्वर मंदिर प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा,अमोल कोमावार यांची विधानसभा उपाध्यक्षांकडे तक्रार…

0

🔥केदारेश्वर मंदिर प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा,अमोल कोमावार यांची विधानसभा उपाध्यक्षांकडे तक्रार.

यवतमाळ -/ पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित पुरातन शिव मंदिर अशी नोंद असलेल्या यवतमाळच्या केदारेश्वर शिवमंदिरात मुर्तीभंग तसेच अवैध बांधकाम प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचेकडे केली आहे.पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही प्राचीन मंदिरात बांधकाम, दुरुस्ती किंवा बदल करता येत नाही आणि तसे करायचे असल्यास पूर्वपरवानगी अनिवार्य असते. मात्र केदारेश्वर मंदिराच्या ट्रस्टींनी या नियमांना बगल देत मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातील पुरातन विधीवत स्थापित मुख्य शिवलिंगाच्या संरचनेत बदल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंदिर परिसरात असलेले सुमारे पंधराशे वर्षे जुने ऐतिहासिक कुंड बुजवून संरचनेत बदल करण्यात आला आहे. हे कुंड केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे होते. या कुंडातील मोठ्या संख्येत असलेले कासव कुठे गेले याचाही पत्ता लागलेला नाही. पुरातण मुर्तींना रंगरंगोटी, परिसरातील पुजणीय झाडांची कत्तल, शिवलिंग मध्ये बदल, कुंड बुजविणे आणि मूळ रचनेत बदल करणे पुरातत्व कायद्याचा भंग असून हिंदू धर्मीयांच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशावर घाला असल्याचे अमोल कोमावार यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरातत्त्व विभागाने दिनांक 12 ऑगष्ट 2023 रोजी पाहणी करुन केदारेश्वर मंदिर या राज्य संरक्षित स्मारकाच्या दर्शनी भागातील अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेले आहे. तरीही जिल्हा प्रशासन कुठलीच कारवाई करायला तयार नाही.

🔥ऑडीट करण्याची मागणी

केदारेश्वर मंदीराला दानात मिळालेली जमिन अधिका-यांना हाताशी घेऊन कुळ लाऊन विक्री करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच चर्चेत आले होते. अशाच प्रकारचे अनेक गैरप्रकार संस्थानात घडले आहे. त्यामुळे येथील संपुर्ण व्यवहाराचे सखोल ऑडीट करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!