कोऑपरेटीव्ह बैंकेतील जमा असलेला पैसा मिळाला नाही तर ८२ वर्षांची म्हातारी करणार आत्महत्या…..

0

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर येथील ८२ वर्षांची म्हातारी नथाबाई लवनकर यांचे गेल्या अनेक वर्षांपासून कोऑपरेटीव्ह बैंकेत दोन लाख पन्नास हजार रुपये अडकून असल्याने त्यांचे जीवन आता धोक्यात आले आहे तिच्या सामोर मोठे संकट निर्माण झाले आहे पती जिवंत असतांनी सोडा ऐक्कर शेती विकुन कोऑपरेटीव्ह बैंकेत पैसे जमा केले आणि तेव्हापासून फार थोडे पैसे देण्यात आले त्यामुळे नथाबाई लवनकर यांचे म्हातारपनात फार मोठे हाल होत आहे आणि औषधी विकत घेण्यासाठी सुध्दा पैसे शिल्लक राहिले नाही त्यांच्या हातापायाला मोठ्या दुखापती झाल्या असून पुर्ण बॅंडेज पट्ट्या आहे गेल्या अनेक वर्षांपासून नथाबाई लवनकर यांचे आरोग्य चांगले नसुन आता त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे मृत्यू झाल्यावर संबंधित अधिकारी वर्ग दोषी असेल असे मत नथाबाईने प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून वयानुसार चालने सुध्दा कठीण झाले आहे अशा परिस्थितीत त्यांच्यावर वरूड येथील गोधने रूग्णालयात उपचार सुरू होते परंतु आता पैशाअभावी उपचार बंद झाले आहेत त्यांना विविध आजारांनी ग्रासले असून पैसा अत्यंत महत्त्वाचा आहे जर पैसा नाही मिळाला तर आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले माझा पैसा कोऑपरेटीव्ह बैंकेत असून मला दिल्या जात नाही म्हणून म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.                      🔥मी साहुर येथील रहिवासी असून आता माझे वय ८२ वर्षांच्या वर आहे आता मला विविध आजारांनी ग्रासले असून माझ्याकडुन चालने सुध्दा होत नाही दावाखाण्यात जायला सुध्दा पैसे नाही माझा सर्व पैसा कोऑपरेटीव्ह बैंकेत असून मला माझाच पैसा परत द्यावा नाहीतर मी आता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे तशी चिट्ठी सुध्दा लीहुन ठेवत आहे माझ्या आत्महत्येला जबाबदार संबंधित अधिकारी राहील याची नोंद घ्यावी.   (नथाबाई लवणकर साहूर)

शरद वरकड साहसिक news -/24 साहूर आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!