आष्टी (शहीद) -/येथील क्रांती ज्ञानपीठ शाळेत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी आयोजित करून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.या विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्राथमिक गट व माध्यमिक गट असे दोन गटात विभागणनी करण्यात आली होती.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष निचत , सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र सावरकर तसेच प्रावीण्य स्टडी सर्कलच्या सौ आनंदी सव्वालाखे आणि आराधना नाट्य मंडळाचे सचिव विजय सव्वालाखे , उपाध्यक्ष सुमेधजी धोंगडी ,कोषाध्यक्ष रामाजी धोंगडी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा ठाकरे इत्यादी उपस्थित होते. यावेळी डॉ.आशिष निचत यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांनी प्रोजेक्टचे परीक्षण करून परीक्षकाची मोलाची भूमिका पार पाडली.प्राथमिक गटातून प्राविण्य मिळविलेले पार्थ प्रवीण बिजवे प्रथम क्रमांक, अथर्व देवेंद्र शहाणे द्वितीय क्रमांक आणि मनस्वी संदीप गावंडे तृतीय क्रमांक तसेच शिवम संजय डहाके आणि नौमन अजमत खान पठाण, यांना प्रोत्साहनपर व आद्विक मिलिंद वाघ आणि माध्यमिक गटातून प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी परी राहुल दापूरकर प्रथम क्रमांक आणि पूर्वा किशोर टेकाम, द्वितीय क्रमांक आसिया अलम आसिफ खा नवाब , तृतीय क्रमांक सम्यक गंगाधर वाघ, प्रोत्साहन पर भैरवी गजानन मंदाने, स्वराली तुकाराम जी लांडगे, संस्कृती चंद्रशेखर करपे या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरणाचे कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे पत्रकार गजानन भोरे आणि भश्रभाजपाचे तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रवीण पाटील ,श्री सचिन घाटोळ श्री अंकुशजी रेणके ,श्री ढगे ,श्री नायकोजी (सर्व प.स.आष्टी )यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ होण्याकरिता विज्ञान प्रदर्शनी ही काळाची गरजआहेअसे मुख्याध्यापिका निलीमा ठाकरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. उपस्थितीत सर्व मान्यवरांनी विजेते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे अभिनंदन केले कार्यक्रमाचे नियोजन रोहिणी लांडे , वंदना लेकुरवाडे ,प्रेमा गुल्हाने यांनी केले तर सूत्रसंचालन पल्लवी पाटील व अर्चना मदनकर यांनी केले .कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून तृप्ती काकपुरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.