खासदार अमर काळे ईव्हीएम वरुन झाले ट्रोल..

0

🔥तुम्ही लोकसभेत निवडून आले तेंव्हा ईव्हीएम चांगले आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम खराब कसे?” नेटकरींचा सवाल.

🔥पत्नीचा झालेला दारुण पराभव खासदार महोदयांना भलताच जिव्हारी लागला.

वर्धा -/ लोकसभा क्षेत्राचे खासदार अमर काळे ईव्हीएम च्या मुद्यावर चांगलेच ट्रोल झाले आहे. पत्नीचा दारून पराभव भाजपाचे सुमित वानखेडे यांनी केला.अन् मग काय खासदार महोदयांनी पत्नीच्या दारून पराभवाचे खापर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएम वर खापर फोडून मोकळे झाले. त्या पत्रकार परिषदेचे पोस्ट खासदारांनी त्यांच्या अकाऊंट वरून फेसबुक ला पोस्ट केली. मग काय खासदार महोदयांचा खरपूस समाचार नेटकऱ्यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना हरवून अमर काळे खासदार पदी निवडून आले तेंव्हा ईव्हीएमनीच मतदान झाले. तेंव्हा ईव्हीएम चांगले होते आणि आता विधानसभेत पत्नीच्या दारुण पराभव पचनी पडत नसल्याने ईव्हीएम रातोरात खराब झाले, अस कस ईव्हीएम अचानक खराब झाले. खासदारांची पत्रकार परिषद म्हणजे रडक्यांच्या गोटात स्व कतृत्वाला दोष न देता ईव्हीएम वर खापर फोडून रडीचा डाव खेळला आहे.

लोकसभा निवडणुकीत अख्खा महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरशी राहिली होती. तेंव्हा कोणीच ईव्हीएम च्या नावे बोंब मारली नाही. आता महाविकास आघाडीचे सन्माननीय खासदार यांनी जशी ईव्हीएम विरोधात फेसबुक वर पोस्ट टाकली तशेच ते ट्रोल व्हायला सुरू झाले. एकानं तर चक्क “मी तर शंका लोकसभेपासूनच घेत होतो, तेव्हा अमरभाऊने लक्ष नाही दिलं” असा मिश्किल टोला हाणला. एकाने तर चक्क “ट्रायल म्हणून वर्धा लोकसभा मतदार संघाचा राजीनामा द्या मग ट्रायल घ्यायला लावू” असं म्हणत लोकसभेची निवडणूक पुन्हा बॅलेट वर घेण्याची भाषा केली.

एकंदरीतच खासदारांनी ईव्हीएम संदर्भात घेतलेल्या पावित्र्याचा कडाडून विरोध केला जात आहे. “तुम्ही निवडून आले मग तोही ईव्हीएम घोटाळा होता का मग? “असा सवाल एका नेटकऱ्यांनी उचलला. एकाने तर चक्क खासदारांनी आमच्या गावातील दारू पकडून देण्यासाठी मदत करावी अशी मिश्किल टिपनी केली. एकाने तर पार खासदाराने आर्वी सोडून लोकसभा क्षेत्रातील एकाही ठिकाणी साधी भेट दिली नाही.. तुमच्या पेक्षा तर तडस साहेब बरे होते. तुम्ही तर फोन सुद्धा उचलत नाही. असा आरोप खासदारांवर लावत रामदास तडस यांची पाठराखण केली. खासदार अमर काळे ईव्हीएम मुद्यावरून नेटकऱ्यांचे दावे, प्रती दावे आणि वस्तुस्थितीशी निगडित सवालांने सोशल मीडियांत तोंडघशी पडत आहे. सरतेशेवटी ईव्हीएमचा मुद्दा खासदारावर उलटल्याचे चित्र आहे.

 ब्युरो रिपोर्ट साहसिक NEWS-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!