वर्धा -/आध्य ग्रामगीताचार्य प्रतिष्ठान तर्फ दोनशे च्यावर रुग्णाला मदत वर्धा, पवनार मधील श्रुती विक्की वाटगुळे वय २४ मागील आठ दिवसां पासून सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखान्यात पोटाच्या आजाराने ञस्त होत्या सेवाग्राम येथील आरोग्य विमा कार्ड नसल्यामुळे,व महात्मा ज्योतीबा फुले स्कीम लागु न झाल्यामुळे,सेवाग्राम येथील कस्तुरबा दवाखान्याच्या रेफरल स्लीप व्दारे मागील दहा वर्षा पासुन आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा बेलुरकर विचार प्रतिष्ठान नागपुर आरोग्य रेफरल स्लीप व्दारे गरजु रुग्णाला मदतीचा हात देऊन आज पर्यंत दोनशेच्यावर रुग्णाला मदत केली आहे. पवनार येथील श्रुत्ती विक्की वाटगुळे या गरजु रुग्णाला आध्य ग्रामगीताचार्य रामकृष्ण दादा प्रतिष्ठाननी मदत करुन चार हजार रुपयांपर्यंत आलेल्या बिलाचा खर्च उचलून मदतीचा हात दिला आहेत,सेवाग्राम येथील दवाखान्यात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्त विजय कोल्हे,नितीन जिंदे, लाला दिवेकर सुरेद बेलुरकर, ही मंडळी या सेवेचा खर्च स्वता जमा करुन गरजु रुग्णाला मदतीचा हात देत आहेत, प्रफुल्ल तुरके , पंकज अंबुलकर, हे कस्तुरबा दवाखान्यात अश्या गरीब रुग्णाची भेट घेऊन त्या सर्व रुग्णाची माहीती ग्रामगीताचार्य प्रतिष्ठान ला देऊन मदतीचा हात देत आहेत, डॉ. बाळासाहेब पदवाड, गुलाबराव उके,उध्दव साबळे यानी रेफरल स्लीप चे कार्य करणाऱ्या टिमचे अभिनंदन केले आहे.