गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही…

0

🔥गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

वर्धा -/ माननीय सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 21 जानेवारी 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा नांदोरा शिवारात गांजा मालाची तस्करी करणारे आरोपी 1) मंगेश उर्फ रावण चिंतामण चांदोरे, रा. वार्ड नं. 01 नांदोरा, सेवाग्राम, 2) मुकेश उर्फ चिट्टा दिलीपराव खैरे, रा. वार्ड नं. 02 नवीन वस्ती सेवाग्राम, 3) शेख शहानवाज शेख चांद, रा. झाकिर हुसेन कॉलनी वर्धा यांचेवर कार्यवाही करीत त्यांचे ताब्यातुन 02 किलो 011 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, ईलेक्ट्रिक अॅटो क्र. एम.एच. 32 ए.के. 1891, स्प्लेंडर मोटर सायकल क्र. एम.एच. 32 बी.बी. 0747 व 3 मोबाईलसह जु.कि. 5,72,220 रू चा मुद्देमाल जप्त करून त्यांना गांजा मालाचा पुरवठा करणारा गुड्डु जयराम नाग रा. काटापंजी जि. बलंगी राज्य ओडिशा याचेसह चारही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. सेवाग्राम येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक . सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!