सेलू -/खाली जागेच्या मोजणी वरून चौघांनी एका महिलेला शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली.उज्वल रत्नाकर कुत्तरमारे वय ४९ रा.गायमुख यांनी ता.६ मे मंगळवारी रोजी सायंकाळी रवींद्र कुळकर्णी,सार्थक कुळकर्णी,सुषमा कुळकर्णी व अर्चना पाटील सर्व रा. गायमुख यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार उज्वला कुत्तरमारे यांनी आपल्या मालकीच्या खाली जागेची मोजणी करण्यासाठी भूमापन कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यावरून आज मंगळवारी जागेची मोजणी करण्याकरिता भूमापन कार्यालयाचे कर्मचारी आले असता त्यांना मोजणीसाठी विरोध केला. अर्जदार महिलेने मी माझी जागा मोजत आहे.तुम्ही का विरोध करता असे म्हटल्यावरून चारही गैर अर्जदारांनी महिलेस शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.अशी तक्रार महिलेने पोलिसांत दाखल केली अधिक तपास सेलू पोलीस करीत आहे.