गायिका लता मंगेशकर यांचं निधन
वृत्तसंस्था – मुंबई :
गायिका लता मंगेशकर यांचं रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोनाची लागण झाली आणि नंतर निमोनियाची लागण झाली.
लता मंगेशकर यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार चालू होते. त्या महिनाभर आयसीयू विभागात उपचार घेत होत्या. 11 जानेवारीला लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं.
लता मंगेशकर यांची कारकीर्द
लता मंगेशकर त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि त्यांचं पहिलं गाणं 1942 मध्ये रेकॉर्ड केलं. त्यांनी आतापर्यंत 14 विविध भाषेत पन्नास हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. त्यांचं संगीतातील योगदान पाहता 90 च्या वाढदिवसाला भारत सरकारनं डॉटर ऑफ द नेशन अशी पदवी त्यांना दिली.
एक प्यार का नगमा है, राम तेरी गंगा मैली, एक राधा एक मीरा, दीदी तेरा देवर दिवाना यासारख्या प्रसिद्ध आणि अजरामर गाण्यांचा आवाज लता मंगेशकर बनल्या. त्यांच्या कार्याचा सन्मान करत 1969 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणने त्यांना सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर 1999 मध्ये भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेलं. 2001 मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देखील त्यांना प्रदान करण्यात आला.