देवळी -/तालुक्यातील तांबा या गावाच्या परिसरात एक हरिणाचे पिल्लू आपल्या कळपामधून भटकून गावाच्या हद्दीत दाखल झाले होते. त्या हरिनाच्या पिलाचा पाठलाग गावातील मोकाट कुत्रे करीत होती त्याच्याकडे गावकऱ्यांचे लक्ष गेले गावकऱ्यांनी कुत्र्याला हाकलून धास्तावलेल्या जखमी हरिणाच्या पिलाला पकडून त्याला पाणी पाजले गावातील पोलीस पाटील यांना या घटनेची माहिती दिली पोलीस पाटलांनी एस पी गावंडे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला तेव्हा रात्री वनरक्षक एस पी गावंडे आपल्या एका सहकार्या सोबत दुचाकी वाहनाने घटनास्थळी पोहोचले गावकऱ्यांनी त्या हरण्याच्या पिलाला त्यांच्या स्वाधीने केले आणि हरणाच्या पिलाला जीवनदान मिळाले.