हिंगणघाट,-/गिमाटेक्स वणी युनिट येथिल श्री.पंकज सैनी हा कामगार रिंगफेम विभागात कामगार म्हणून कार्यरत होता, मागील दोन महिन्यापुर्वी काही कारणास्तव गळफास लावून आत्महत्या केली, त्या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या निर्देशानुसार कामगार संघटनेने गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर पठाण साहेब यांचेमार्फत पाठपुरावा करून सर्व कामगारांच्या पगारातुन प्रती १०० रू कपात करून एकुण १ लाख ४३ हजार २०० रूपयांचा धनादेश मृत कामगाराच्या परीवाराला देण्यात आला, यावेळी आ. कुणावार यांचेसह उपस्थित संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे, दिवाकर बरबटकर,राकेश तराळे, प्रशांत शेळके, विजय थुल, विनोद कोल्हे, लक्षण जयपुरकर, राहुल देशमुख, हेमंत भगत, दामोदर देशमुख,जिवन भानसे, मनोज जुमडे, विनोद कावळे, श्रावण थुटे, जयंत बावणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.