हिंगणघाट -/ येथे दिनाक 03 आगस्ट 2024 रोजी फिर्यादी नामे साहेबराव बापुराव झोंटींग,वय 55 वर्श, रा. अजनगाव,ता.हिंगणघाट,जि.वर्धा हे हिंगणघाट येथील किरण वादाफळे याचेकडुन 50,000/- रूपये उसनवारी घेवुन मुलासोबत मोटर सायकलवर हिंगणघाट येथुन आपले गावाकडे जात असतांना वणा नदिचे पुला जवळ आले असता,अज्ञात नागा साधुनी त्यांना थांबुन नागा साधु आले आहे व ते गाडीत आहे,आपण नागा साधुचे दर्षन घ्या असे म्हणुन फिर्यादी याना गाडी जवळ घेवुन जावुन त्याचे पॅन्ट चे खिशातील नगदी 50,000/- रूपये जबरीने हिसकावुन नेले असा फिर्यादी यांनी पेालीस स्टेशन,हिंगणघाट येथे दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अप क्रमांक 1053/2024 कलम 309(4), 3(5) भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हा हा अंत्यत क्लिस्ट व गंभीर स्वरूपाचा असल्याने व कुठलाही पुराव उपलब्ध नसताना,स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यानी सदर गुन्हयाचा संमातर तपास अंत्यत चिकाटीने व तपास कैशल्याचा वापर करून सदर गुन्हयात आरोपींतानी वापरलेली चारचाकी मारोती सुझुकी ईरटीगा गाडी निश्पन्न करून गुन्हयातील आरोपी हे सदर चारचाकी गाडीने यवतमाळ जिल्हयात दारव्हा,नेर येथे फिरत आहे अषी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा चे पथक त्याचे मागावर गेले असता,सदर आरोपी हे त्याचे चारचाकी वाहनाने यवतमाळ कडुन वर्धा कडे त्याचे चारचाकी वाहनात साधुचे वेषात असलेले ईसम दिसुन आले व यवतमाळ येथुन वर्धाकडे येत असता, सदर आरेापींताना हुसनापुर टोल प्लाॅझा येथे नाकेबंदी करून सुझुकी ईरटीगा वाहन क्रमांक जि.जे.01-आर.एक्स-0745 चे सह आरोपी क्रमंाक 1) करणनाथ सुरूमनाथ मदारी, वय 22 वर्श, 2) कैलसनाथ सुरेशनाथ मदारी, वय 27 वर्श, दोन्ही रा. सरोस्वनी, ता. मेमदावाज, जि. खेडा, राज्य गुजरात 3) गणेशनाथ बाबुनाथ मदारी, वय 18 वर्श, रा. कोठीपुरा, ता. मेमदावाज, जि. खेडा, राज्य गुजरात 4) प्रताभनाथ रघुनाथ मदारी, वय 28 वर्श रा. हलदरावास, ता. मेमदावाज, जि. खेडा, राज्य गुजरात 5) धिरूनाथ सरकारनाथ मदारी, वय 26 वर्श, रा. कपडवंच, जि. खेडा, राज्य गुजरात ताब्यात घेवुन सदर आरोपींताना पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे घेवुन जावुन गुन्हया संबंधाने सविस्तर विचारपुस केली असता, त्यानी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्या वरून आरोपींताचे ताब्यातुन गुन्हा करतांना वारलेली मारोती सुझुकी ईरटीगा वाहन क्रमांक जि.जे.01-आर.एक्स-0745 किंमत 8,00,000/- रू, लुटमार केलेले नगदी 50,000/- रू व त्याचे पाच मोबाईल किंमत 41,000/- रू असा एकुण जुमला किंमत 8,91,000/- रू चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, नूरूल हसन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, डाॅ. सागर कवडे, यांचे निर्देशानुसार पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व पोलीस निरीक्षक मनोज गभने, पोलीस स्टेशन,हिंगणघाट याचे मार्गदर्षनात पोउपनी सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, अरविंद इंगोले, अक्षय राउत सर्व नेमणुक स्थाानीक गुन्हे शाखा, वर्धा तसेच प्रंशात ठोंबरे, राहुल साठे, आशिश नेवारे अमोल तिजारे, विजय काळे यांनी केली. पुढील तपास पोउपनी भारत वर्मा, पोलीस स्टेशन,हिंगणघाट हे करीत आहे.