🔥”संघणकाचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होण्यास मिळेल मदत- डॉ. विनय देशपांडे.
आर्वी -/येथील स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी स्मृती समिती संस्था व्दारा संचालित शाळा गुरुकुल इंग्लिश स्कूलला श्रीकांत पेंडके नगर बौद्धिक प्रमुख आर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी संगणक संच भेट म्हणून दिला.आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात विद्यार्थी दशेतील लहानग्यांना सुलभतेने संघणक हाताळने शक्य व्हावे म्हणून भेट रुपात मिळालेल्या संघणक संचाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संघणकाचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होण्यास मिळेल मदत होईल असे डॉक्टर विनय देशपांडे अध्यक्ष वर्धा नगरी सहकारी अधिकोष व अध्यक्ष स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी स्मृती समिती आर्वी यांनी सांगितले.या प्रसंगी डॉक्टर विनय देशपांडे अध्यक्ष वर्धा नगरी सहकारी अधिकोष व अध्यक्ष स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी स्मृती समिती आर्वी, योगेश ताजनेकर सचिव स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी स्मृती समिती आर्वी, मयूर पोकळे, हर्षल देशमुख, अमोल मुधोळकर, प्रणित लोखंडे यांच्यासह योगिता लोखंडे, दर्शना आपकाजे, श्रेया राऊत या शिक्षकांसह कर्मचारी अरुणा नादेकर, कविता सातपुते तसेच आदींची उपस्थिती होती.