देवळी -/ ऑलम्पिक मधला परफॉर्मन्स पाहता असे लक्षात येते की आपल्या देशात क्रीडा क्षेत्राला जास्त वाव देणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातही चांगली खेळाडू निर्माण होऊ शकतात याकरिता गरज आहे ती ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची,असे प्रतिपादन स्टेअर फाउंडेशनचा वतीने आयोजित राज्य व राष्ट्रीय स्तरीय प्रदेश प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा सत्कार समारंभात उद्योजक व समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी स्थानिक शामसुंदर अग्रवाल धर्मशाळेच्या सभागृहात पार पडला.तसेच पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मोहन बाबू अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर प्रसिद्ध शायर तथाकवी इमरान राही पत्रकार जितेंद्र गोरडे देशोन्नतीचे पत्रकार गणेश शेंडे, स्टेअर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक रवी बानमारे व पोलीस निरीक्षक दिलीप बानमारे मंचावर उपस्थित होते.आपल्या भाषणात कॅप्टन गुजरकर म्हणाले की कोणतेही देशाचा विकास हा खेळाच्या मैदानावर दिसून येतो.म्हणजेच तरुण पिढी खेळामध्ये किती आवडीने सहभागी होते त्यावरून त्यांची तत्परता व समर्पण निर्माण होत असते याकरिता प्रत्येकाला खेळ हा आवश्यक केला पाहिजे तर इमरान रही म्हणाले खेळाला प्रोत्साहन देऊन त्यात प्रत्येक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना किमान एका खेळात सहभागी करणे आवश्यक आहे. यासोबतच खेळाचे अद्यावत मैदान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले पाहिजे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टेअर फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र बानमारे करून ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात सहभागी करणे आमचा मानस आहे. याकरिता आम्ही कटिबद्ध असून खेळांचा विकास करणार आहोत.प्राविण्य प्राप्त खेळाडूंमध्ये विनीत आखाडे, रेणुका वाणी, समीक्षा यावले, स्पर्श ढोले सक्षम पाटील, अथर्व आदमने वंश सूर्यवंशी, श्लोक नागरगोजे, श्रुती दुर्गे सार्थक बॉम्बे सुदर्शन पवार, भैरवी तराळे, शौर्य कांबळे, कृष्णा तडस, मानव माजरखेडे, धैर्य दुधे, शौर्य दुधे, वेदांत उईके ओम परतेकी, शिवम दुर्गे प्रतीक निहारे, ध्रुव मसने, अथर्व गावंडे, शिवानी असंसुरे अनुष्का आटे, वैभवी वांदिले, पूर्व दुर्गे व खुशबू उईके यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.प्राविण्य प्राप्त खेळाडूंना स्वर्गीय प्राध्यापक पंकज चोरे यांच्या स्मृतीनिमित्त स्मृतिचिन्ह देण्यात आलीत.यशस्वीतेकरिता सुरज ठाकरे हर्षा पेंदोर राजू भगत संदीप खैर यांच्यासह फाउंडेशनच्या प्रशिक्षकांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रीती वैतागे आभार गौरी चौधरी यांनी मानले.