ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण, व शिवीगाळ…

0

🔥वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर असभ्यतेचे प्रकार वाढले….

देवळी -/ देवळी येथे सोनेगाव येथील विनोद भरणे याची चार दिवसापूर्वी हत्येविषयी उमटलेले पडसाद क्षमतनाहीत तोच गावगुंड्याचे दादागिरीचे प्रमाण अजूनही कमी झाल्याचे दिसत नसल्याचे दिसून येत आहे.अशातच देवळी येथे २८ जून रोजी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व सुरक्षा कर्मचारी यांच्याबरोबर वाद घालून सुरक्षा कर्मचाऱ्यास मारहाण करण्याचा प्रकार घडलेला आहे.मनोज ज्ञानेश्वर राठोड वय ३० वर्ष रा.पाचगाव देवळी याने आपल्या पत्नीला उपचाराकरिता रात्री अकरा वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय देवळी येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी प्रियंका हमपे यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली आणि सुरक्षा कर्मचारी रोशन धारे याला सुद्धा मारहाण करून शिवीगाळ केली याप्रकरणी देवळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे परंतु आरोपी हा सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. जेवढी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आशिष लांडे यांच्याबरोबर संवाद साधला असता त्यांनी काही मंदधुंद अवस्थेत काही युवक इथे येऊन दादागिरी करणे व शिवीगाळ करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले याप्रकरणी पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन यांचा बंदोबस्त करावा व नागरिकांनी उत्तम आरोग्य सेवा मिळण्याकरिता सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!