घराचे खोदकाम करीत असताना युवकाचा करंट लागून मृत्यू….

0

 वर्धा -/ आज 19 जून रोजी तळेगाव शा.पंत येथील रामदरा भागात मानमोडे यांचे घराचे बांधकाम सुरू केले होते.. सदर भाग हा मुरूमाचा असल्यामुळे घरमालकाने जे सी बी चे साहाय्याने कॉलम करीता खड्डे केले होते.पण ते खड्डे ओबड धोबड असल्यामुळे ते व्यवस्थित करण्याकरिता आनंदवाडी येथील चेतन दिलीपराव कोल्हे वय 22 वर्ष तसेच त्याचे सोबत एक व्यक्ती कामावर आले होते.आज सकाळी साडे आठ वाजताच दरम्यान मृतक युवक याचे जवळ असलेली खड्डे खोदाची मशीन घेवून तो खड्ड्यात उतरला आणि दुसरे सोबत असलेल्या एकाने इलेट्रीक बोर्ड मध्ये वायर टाकताच मृतकाला मशीनचा जोरदार करंट चा धक्का लागून जागीच ठार झाला.करंट लागताच जो व्यक्ती सोबत होता त्याला काहीच सुचले नाही त्यांनी जर थोडी समय सूचकता दाखवून इलेक्ट्रिक बोर्ड मधून जर वायर लागलेली पिन काढली असती तर त्या युवकाचा जीव वाचला असता असे भावनिक उदगार घटनास्थळावरील नागरिक बोलत होते.ही घटना आजू बाजूचे नागरिकांचे लक्षात आल्या नंतर याची माहिती पोलिसांना दिली.काही वेळाने पोलीस घटनास्थळावर येत पंचनामा करून मृतदेह हा शव विच्छेदन करण्याकरिता आर्वी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. सदर घटनेचा तपास ठाणेदार संदीप धोबे यांचे मार्गदर्शनात निखिल काळे,नितेश वाघमारे,गजानन साबळे हे करीत आहे.मृतकामागे आई आणि वडील असून एकुलता एक मुलगा होता.घटनास्थळावर आई ने येताच एकच हंबरडा फोडला यावेळी घटनास्थळावरील महिला तसेच पुरुषांना अश्रू अनावर झाले होते.

🔥निष्काळजी पणा कोणाचा?🔥
सदर मकानाचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्या करीता इलेक्ट्रिक डिपार्टमेंट यांनी बाजूला असलेल्या खंबावरून वायरची जोडणी करून दिली होती पण त्यांनी अर्थींग तार टाकला नव्हता हे विशेष.कारण मृताका जवळ जी मशीन होती ती नवीनच घेतली होती.तसेच टी ज्या बोर्ड मधून सप्ल्याय घेतला होता तो वायरही नवीनच होता.त्यामुळे त्या मशीन मध्ये करंट आलाच कसा याचा शोध घेणे अनिवार्य आहे.असे घटनास्थळावरील नागरिकांकडून बोलल्या जात होते.

गजेंद्र डोंगरे साहसिक news -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!