🔥घाटंजी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित,अंगणवाडी भरती प्रकरण आले अंगलट.
घाटंजी -/येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयातंर्गत कार्यरत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी विक्रांत राऊत यांना अंगणवाडी भरती प्रकरणी निलंबीत करण्याचे आदेश यवतमाळ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले आहेत.
अंगणवाडी भरती प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने, चौकशी समितीने सादर केलेल्या अहवाला वरुन सचोटीचे पालन न करणे आणि कर्तव्यात कसुर करणे या कारणावरून यवतमाळ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे आदेशान्वये प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा विस्तार अधिकारी (सांख्यिकी) कार्यालय एकात्मीक बाल विकास सेवा योजना कार्यालय घाटंजी पंचायत समिती घाटंजी विक्रांत राऊत यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा [शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार तात्काळ निलंबित करण्यात येऊन, त्यांचे विरुध्द विभागीय चौकशी सुरु करण्यात येईल. तसेच निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती उमरखेड ठेवण्यात आले असुन निलंबन काळात त्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांचे पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडु नये, सोडल्यास ती गैरवर्तणुक ठरेल. असेही आदेशीत करण्यात आले आहे.