चंद्रपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे पत्रकार, प्रतिनिधी, स्नेहमिलन सोहळा संपन्न
प्रतिनिधी / चंदपूर :
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे चंदपूर जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, व पदाधिकारी यांचा स्नेहमिलन सोहळा व आढावा बैठक शाशकिय विश्रामगृह
येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळयाचे अध्यक्षस्थानी
पत्रकार संघाचे विदभं अध्यक्ष प्रा. महेश पानसे हे होते, तर विदर्भ उपाध्यक्ष प्रदिप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. सुरवातीला कोरोना काळात जिव गमावणारे पत्रकार सदस्य, कै.गुरुदेव अलोने,आकाश भालेराव,भगवंत पोपटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कोरोना काळात संपुर्ण राज्य संघाने राज्यभर व चंदपूर जिल्हा संघ व संपुर्ण तालुका शाखांनी सामाजीक बांधिलकी जोपासून विवीध उपक्रमातून बाधितांना व गरजूंना मदत केली .अशाही काळात संघटनेच्या
धोरणांनुसार पत्रकार हिताथं कायंसुद्धा सुर ठेवून बांधिलकी जोपासून सदस्यांनी आपली पत्रकारिताही जोपासली.
याप्रसंगी चिमूर,भद़ावती, वरोरा,सावली तालुका शाखा अध्यक्ष,सचिव, पदाधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सिंदेवाही,राजूरा,कोरपणा,बल्लारपूर शाखेच्या नवनियुक्त अध्यक्ष यांचे व पदाधिकारी यांचे विशेष अभिनंदन
करण्यात आले.
वर्ष २०२० चे जिल्य्हयाचे नियतकालिक, दि.१८-१२-२०२१ ला ठाणे येथे आयोजीत राज्य अधिवेशन तयारी यासंबंधानें पुरेपूर नियोजन करण्यात आले. सभाध्यक्ष प्रा . महेश पानसे, प्रदिप रामटेके , जिल्हा उपाध्यक्ष
प्रा. धनराज खानोरकर यांनी औचित्यपूर्ण मागंदशँन करून पुढी वषॉत संघ अधिक जोमाने कायंरत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
सर्व तालुका अध्यक्ष, व पदाधिकारी यांनी आपले विचार ठेवले.व आढावा सादर केला.
प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सुनिल बोकडे यांनी केले. सोहळयाचे संचालन जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ कुकडे
तर आभारमत कायॉध्यक्ष जितेंद़ चोरडिया यांनी मांडले.
या सभेत सर्व तालुका अध्यक्ष,, पदाधिकारी, सचिव आदी उपस्थित होते.