चित्रकलेतून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळतो,मोहन अग्रवाल..

0

🔥चित्रकलेतून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव मिळतो,मोहन अग्रवाल.

देवळी -/ चित्रकलेतून बोलके चित्र व्यक्त करता येते चित्रकला ही अशी कला आहे ज्यातून चित्रकाराच्या मनातील चित्र साकारता येते म्हणूनच शाळा महाविद्यालय जीवनातच चित्रकला स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे या दृष्टिकोनातून चित्रकलेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांनी 22 जानेवारी रोजी शामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत आयोजित चित्रकला तथा पोस्टर मेकिंग स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी विभाग व निसर्ग सेवा समिती वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धा स्थानिक शामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत आयोजित करण्यात आली होती. यात वर्ग पाच ते सात या गटाकरिता ‘पर्यावरणाचे संवर्धन’ या विषयावर, वर्ग आठ ते दहा या गटाकरिता वृक्षारोपण व संवर्धन तर वर्ग अकरावी ते पदवीधर विद्यार्थ्यांच्या गटासाठी स्वातंत्र्य चळवळीतील क्षण किंवा ‘सैनिक जीवन’ या विषयावर चित्रकला व पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले असून यात देवळी शहरातील २०० मुला-मुलींनी सहभाग घेतला

स्पर्धेचे उद्घाटन देवळीचे उद्योगपती तथा समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरम उपाध्यक्ष तथा उर्दू कवी इमरान राही, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, समाजसेवक राजू लभाने, गणेश शेंडे, संतोष तुरक व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते

सदर स्पर्धेत प्रत्येक गटाला प्रथम तीन पुरस्कार दिले जाणार असून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना दहा प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन विजेतांना 23 जानेवारी रोजी आयोजित महाविद्यालय एनसीसी वर्धापन दिन प्रसंगी एस एस एन जे महाविद्यालयाच्या प्रांगणात दिले जाणार आहे.

चित्रकला स्पर्धेचे संचालन अंडर ऑफिसर कोमल शितळे हिने तर आभार समीक्षा निवारे हिने आभार मानले यशस्वी ते करिता पायल चौके, कुंदन कावळे, साक्षी परिसे, राम देशमुख, यामिनी पारधी, साहिल गेडाम, युवराज डफरे, निशांत शितळे यांच्यासह एनसीसी छात्र सैनिकांनी अथक प्रयत्न केले.

सागर झोरे साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!