चीतेगाव येथे ९,१० उर्दू वर्ग सुरु करण्याकरीता अमर अक्रम सय्यद यांचा आत्मदहनाचा इशारा…..

0

औरंगाबाद,बीड़कीन -/ पैठण तालुक्यातील चितेगाव जिल्हा परिषद केंद्रीय उर्दू शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. परंतु चीतेगावातील केंद्रीय प्राथमिक उर्दू शाळा येथे मुलींची संख्या जास्त असून सुद्धा ९,१० वर्ग करीता मान्यता देण्यात आलेली नाही तरी जिल्हा परिषद संभाजीनगर मागील चार वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा मागणी पूर्ण करण्यात येत नाही. ठराव अहवाल पूर्ण कागदपत्रे पैठण पंचायत समिती येथे पाठवलेले आहे.आता प्रयन्त कोन्ही अधीकारी ९,१० वर्ग सुरु करण्या करीता दखल देण्यास तयार नाही. पैठण तालुक्यातील सर्वात प्रथम उर्दू शाळा चीतेगांव येथे सुरू करण्यात आली होती.तरी आतापर्यंत नववी व दहावी वर्गाला मान्यता देण्यात आली नाही २८/०६/२०२४ पर्यंत नववी दहावी वर्गाला मान्यता देण्यात यावी नसता २९/०६/२०२४ रोजी अमर अक्रम सय्यद यांनी चीतेगांव येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधीकारी यांना लेखी अर्ज देण्यात आलेला आहे.

अरक्षद शेख साहसिक news -/24 औरंगाबाद,पैठण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!