चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
प्रतीनिधी/वर्धा:
आर्वी तालुक्यातील सालफळ ते वीरूळ या ३ कि. मी. स्त्याचे खोलीकरण करून रस्ता पक्का करण्यासाठी ३३ लाखाची मंजुरी देण्यात आली व ते काम चौरसिया कन्स्ट्रक्शन कंपनी ला देण्यात आले त्याप्रमाणे सदरचे काम सुरू झाले. परंतु या कामात नियम धाब्यावर ठेवून मनमर्जिने रोडमध्ये मुरूम व राखड टाकून रोडचे काम पूर्ण करण्यात आले.
रोड च्या कामात वापरण्यात आलेला मुरूम सुद्धा सालफळ गावा लगतच्या नाल्यातला आणून तो रोडवर टाकला यामुळे रोड चे काम पूर्ण पणे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
एवढेच नाही तर, रोडच्या बांधकामात माती मिश्रित सिमेंट तसेच इस्टीमेट मध्ये असलेल्या सळाखीपेक्ष्या कमी दर्जाची सळाख वापरण्यात आली. एवढेच नाहीतर या बांधकामा मध्ये रेतीचा कुठल्याच प्रकारचा वापर करण्यात आला नसल्याने परिसरातील नागरिकांची ओरड आहे. हे सर्व बांधकाम बोगस करण्यात आले असून चौरसिया कंस्ट्रक्शन कंपनीवरती कठोर कारवाई करावी व्हावी तसेच बांधकाम विभागाने रोडच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या सर्व साहित्याचे नमुने तपासणी करिता पाठवावे.
तपासाअंती चौरसिया कॅन्स्टक्शन कपंनीचा परवाना रद्द करून शासकीय नियमांचे उल्लंघन तसेच इस्टेमेट प्रमाणे काम न करता नियमबाह्य काम झाल्याने सदर कंपनी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.