पैठण -/छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील फारोळा शिवारात एका कामगाराचा काम करता दरम्यान मृत्यू झाला आहे हे घटना दिनांक 14 सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी घडली. जय लक्ष्मी कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अनेक कामगार काम करतात. दिनांक 14 सप्टेंबर दुपारच्या दरम्यान कामगार शेख फारुख एजाज (२६)रा.प्रकाशनगर बिडकीन हा दररोज प्रमाणे कंपनीत कामाला गेला असता दुपारच्या वेळेस कंपनीत काम करताना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. या कामगाराला बिडकीन ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले व त्यांच्या प्रेतावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणिता मात्रे यांनी pm करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिले. या अगोदर याच कंपनीत अशे अनेक प्रकार घडलेले आहे येथे कुठल्याही प्रकारची कामगाराला सेफ्टी सुविधा दिली जात नसेल म्हणून अशा घटना अनेक वेळा घडतात म्हणून अशा कंपनीची चौकशी व्हायला पाहिजे व संबंधित कंपनी व्यवस्थापन वर कारवाई होऊन कामगाराला व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी बिडकीन व तालुक्यात होत आहे. कंपनीत घडलेल्या घटनास्थळी बातमी करण्यासाठी विविध दैनिकाचे पत्रकार गेले असता पत्रकार यांना कंपनीचे सुरक्षा रक्षक यांनी गेटवर अडवले.या सुरक्षा रक्षक यांना पत्रकार यांनी सांगितले की घटनेची माहितीसाठी आलेलो आहोत मात्र सुरक्षा रक्षक यांनी सांगितले आम्हाला साहेबाला विचारल्याशिवाय मध्ये सोडता येत नाही तेथे सेफ्टी ऑफिसर आले त्यांना या घटनेची माहिती सांगितली आम्ही विनंती केली की आम्हाला ज्या ठिकाणी हा कामगाराचा मृत्यू झाला ते ठिकाणी दाखवा मात्र त्यांनी कंपनीचे संचालक रांजण देसाई, व ca लोहीया यांनी घटनास्थळी दाखवण्यासाठी विरोध करत पत्रकार सोबत हुज्जत घातली व प्रतीक्रीया द्या सांगितल्यावर मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला.व हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.