🔥जागतिक आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनाचा उत्साह वडधामना मध्ये दुमदुमला.
हिंगणा -/वडधामना येथील वर्धमान सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन, ऑगस्ट क्रांती दिन आणि रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, पोस्टर प्रदर्शनी, विविध स्पर्धा आणि रक्षाबंधन उपक्रम सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुखाध्यापिका कु. शारदा व्यास यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून वाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तटकरे, संस्थाध्यक्ष प्रकाशजी सावळकर, शेषराव राठोड व संदीप हिवराळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन तीर्थराज गव्हाळे यांनी तर आभारप्रदर्शन अजय राठोड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकदिलाने परिश्रम घेतले.