जिजाऊ, सावित्री तसेच रमाई यांच्या संयुक्त जयंती साजरी
इक्बाल पहलवान / हिंगनघाट :
जिजाऊ,सावित्री तसेच रमाई यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार व कृती समितीचे वतीने दि.७ फेब्रुवारी रोजी स्थानिक दीक्षाभूमी सिद्धार्थनगर येथे करण्यात आले
यावेळी विविध सामाजिक, संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले.
दुपारी ३ वाजता आंबेडकर चळवळीचेसंबंधात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनिल जवादे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील डॉ. सुभाष खंडारे, डॉ. माधुरी झाडे, श्रीमती नम्रता भोंगाडे तसेच शहरातील अशोक भारशंकर,अनिकेत कांबळे ,अश्विन तावडे, अखिल धाबर्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
जयंती उत्सवाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, नाट्यप्रयोग, गीतगायन व नृत्य स्पर्धा तसेच सायंकाळी रमाई या एकपात्री नाट्यप्रयोगाचे सौ लता डोंगरे यांनी सादरीकरण केले, रमाई हा नाट्यप्रयोगाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्यात आले असून या नाटयप्रयोगास आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,जयंतीउत्सवाच्या निमित्ताने सुमारे ८४१ व्या प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आले,या प्रयोगाचे सादरीकरणाला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांबळे,अस्मिता भगत, निखिल कांबळे यांनी केले तर अश्विनी पाटील, यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अजय सोरदे,संजय वानखेड़े,दिपक कापसे,किशोर थुल इत्यादिनी परिश्रम घेतले.