आष्टी (श)-/ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल महाड येथे सरकार विरुद्ध केलेल्या आंदोलनात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून जो अवमान केला त्याविरुद्ध आज आष्टी तालुका भाजपा तसेच युवा मोर्चा,अनुसूचित जाती मोर्चा, महिला आघाडी,भटके विमुक्त मोर्चाचे कार्यकर्त्यांनी आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांचे फोटोला जोडो मारा आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्या नेत्यांकडून महामानवाचा अवमान झाल्याने त्यांच्याविरुद्ध निषेधाच्या घोषणा देऊन जितेंद्र आव्हाड यांचे फोटोला जोडे मारण्यात आले या आंदोलनात भाजपा जिल्हा महामंत्री अशोक विजयकर तालुका अध्यक्ष कमलाकरजी निंभोरकर तालुका महामंत्री नरेंद्र भनेरकर, प्रशांत काकपुरे अजय लोखंडे योगेंद्र मतले युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध दंडाळे महिला आघाडी अध्यक्ष आश्लेषा सव्वालाखे भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव बरगे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री देवानंद डोळस अरुण घोडिले साहूरचे सरपंच प्रकाश गायकवाड सावंगा सरपंच विनोद सोनवणे नगरसेविका मीनाताई डोईफोडे माजी नगरसेवक सुरेश काळबांडे महिला आघाडीच्या उषाताई मुंदाने, मायाताई काळबांडे, कल्पनाताई गंध्रे युवा मोर्चाचे आशिष खोपे सौरभ तायडे जीवन कुंभरे आदित्य केवटे दर्शन भलावी आदित्य कुमरे आष्टी शहर भाजपाचे महामंत्री सुधाकर निचत गजानन होले अनिकेत सव्वालाखे सुभाष निंबेकर विनोद घोरपडे प्रदीप गायकवाड आधी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला. यानंतर आष्टी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार यांचे अनुपस्थितीत मंडळ अध्यक्ष एन. जे भेंडे यांना मुख्यमंत्र्याचे नावे निवेदन देऊन जितेंद्र आव्हाड यांचेविरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत सक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.