जिल्हाधिकारी याना जनमाहिती अधिकारी तथा मोटर वाहन निरीक्षण उप प्रादेशिक परिवहन विभाग याच्यावर कार्यवाही करण्याबाबत -आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मीचे लेखी तक्रार 

0

🔥जिल्हाधिकारी याना जनमाहिती अधिकारी तथा मोटर वाहन निरीक्षण उप प्रादेशिक परिवहन विभाग याच्यावर कार्यवाही करण्याबाबत -आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मीचे लेखी तक्रार 

वर्धा -/ माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दिनांक 22/12/2025 रोजी केलेल्या विविध अर्जास दिशाभूल करणारी माहिती देत, मानसिक शारीरिक ,टाळाटाळ देणारी उत्तरे मिळल्याबाबत तसेच संबंधित संदीप मुखे जन माहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक वर्धा यांच्यावर खालील नियमानुसार कारवाई करण्याबाबत,व कार्यलया अधिकाऱ्यांवर आपले नियंत्रण न ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार

आशिष दिलीप सोनटक्के जिल्हाध्यक्ष भीम आर्मी संविधान रक्षक दल माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी काही विषयाच्या अनुषंगाने दिनांक 22/12/2025 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे संदीप मुखे जन माहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक वर्धा यांच्या कार्यालयात माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहितीची मागणी करण्यासाठी अर्ज केला होता, सदर अर्जावर जन माहिती अधिकारी यांनी मला चुकीची दिशाभूल करणारी माहिती दिनांक ०८-१-२०२६ रोजी जावक क्रमांक 49 रोजी पत्रानुसार दिलेली आहे .
मी दिनांक 22/12/2025 रोजी माहिती मागणीची तीन विविध अर्ज/जोडलं अ अन्वये एकूण पाच मुद्द्याची माहिती पुरवण्याची विनंती जन माहिती अधिकारी यांच्याकडे करण्यात आली सदर अर्जदार संदीप मुखे जन माहिती अधिकारी तथा मोटर निरक्षक वर्धा यांनी दिनांक 08/01/2026 चे पत्राने उत्तर पाठविले सदरचा पत्राच्या अवलोकन केले असता त्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ, मानसिक त्रास,देणारी उत्तरे पाठविले आहे
सदर अर्जामध्ये मुद्दा क्रमांक एक मध्ये श्री मंगेश शिंदे (RTO) अधिकारी यांनी एक ऑक्टोबर 2025 ते 22 /12 /2025 पर्यत केलेल्या कारवाईचा अहवाल कागदपत्रा सहीत द्यावा. सदर कार्यालयीन पत्र यांचे उत्तर असे देण्यात आले की श्री मंगेश शिंदे मोटर वाहन निरीक्षक यांनी 1 ऑक्टोबर 25 ते 22/12/2025 या कालावधीत एकूण 61 वाहनावर दंडात्मक कार्यवाही केली आहे, असे उत्तर दिले त्यांच्या अर्धवट उत्तरे विचार करण्यासारखी कोणत्याही कागदपत्राचा अहवाल दिला नाही, कागदपत्रे महत्त्वाचे नाही काय ? नाही वेळ वाया घालवणे, टाळाटाळ करणे, दिशाभूल करणे म्हणून मानसिक त्रास देणे हा उद्देश आहे असे स्पष्ट होते.
सदर अर्ज मध्ये मुद्दा क्रमांक दोन मध्ये श्री मंगेश शिंदे (RTO) अधिकारी यांची वरील तारखेप्रमाणे हालचाल रजिस्ट्रीची प्रतची मागणी केली होती, परंतु संबंधित अधिकारी यांनी माहिती उपलब्ध नाही म्हणून सांगितले ,परंतु भारतीय संविधानाच्या कायद्यानुसार मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांचा 27/ 7/ 2015 चा स्पष्ट आदेश आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 7,8,9,नुसार अभिलेख जपण्याचे कर्तव्य, अभिलेख हरवले सापडत नाही. म्हणणे गुन्हे आहे. त्यासाठी शिक्षा 5 वर्षाचा कारवास व 10000/- रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो,
त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता (BNS- 2023 )कलम 197 ,व 199 नुसार वरिष्ठ अधिकाराच्या व न्यायालयाचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होतो.
त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट निर्णय क्र(writ petition)698/2012 दि.27/12/2015 अभिलेख उपलब्ध नाही ,असे उत्तर आल्यास FIR दाखल करण्याचा अधिकार न्यायालयाने दिला आहे, एवढे असताना सुद्धा संदीप मुखे जन माहिती अधिकारी यांनी कायद्याचा अपमान केला असून कायद्याची कोणतीही भीती नाही असे पत्रात दिसून येत आहे.
सदर अर्जामध्ये मुद्दा क्रमांक तीन मध्ये माहिती विचारली की एखादा जड वाहनावर ओव्हर लोडिंग वर गाडीवर बाबत कारवाई केल्यास चलन भरण्यासाठी किती दिवसाचा अवधी वेळ दिला जातो त्याची शासन निर्णय किंवा आदेशाची प्रत द्यावी असे नमूद केले होते सदर संदीप मुखे जन माहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक वर्धा यांनी माहिती उपलब्ध नाही म्हणून पत्र पाठवले परंतु श्री मंगेश शिंदे RTO अधिकारी यांनी दिनांक 13/11/2025 रोजी ट्रक चालकाची गाडी पकडून गाडीवर अंदाजे 42000/- ते 45000/ हजाराचे चालन केल्याचे समजते व चालन त्वरित भरावे लागेल म्हणून दबावतंत्राचा व आपल्या पदाचा चुकीचा वापर केला व सदर गाडी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन इमारत सालोड (हिरापूर) वर्धा येथे जमा केले यावरून असे स्पष्ट होते की कायद्याचा कोणताही धाक नसताना स्वतःच्या मनमर्जी चे नवीन कायदे तयार करून पदाचा गैरवापर करण्यात येत आहे.
सदर मुद्दा क्रमांक 5 मध्ये मंगेश शिंदे यांच्या 1 ऑक्टोबर 2025 ते 22 डिसेंबर 2025 च्या तारखेनुसार वाहनावर /शासकीय गाडीवर चालकाची नावे त्यांची लायसन्स व ओळखपत्र देण्यात यावी अशी माहिती मागितली ,तर सदर संदीप मुखे जन माहिती अधिकारी तथा मोटर वाहन निरीक्षक वर्धा यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ याचे कडून प्रति नियुक्तीवर चालक उपलब्ध करून देण्यात आले असल्याने त्यांच्या अनुत्तीची ओळखपत्राची या कार्यालयात उपलब्ध नाही असे सांगितले ,परंतु महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक 8 डिसेंबर 2020 रोजी म्हटले की कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे अधिकारी व कर्मचारी (प्रामुख्याने कंत्राटी तत्वावर कार्यालयात नियुक्ती केले जाणारे कर्मचारी तसेच सल्लागार म्हणून शासकीय कामासाठी येणारे व्यक्ती) हे कार्यलया वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचाऱ्याला अनुरूप ठरेल अशा मुद्दा क्रमांक(इ) कार्यालयीन वेळेमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांची विहित नमुन्यातील कार्यालयातील ओळखपत्र दर्शवणारे भागावर व गळ्यात धारण करावे. असे असताना ही उप प्रादेशिक परिवहन विभाग मध्ये साधी एक ओळखपत्र ची झेरॉक्स नाही,तर मग त्यावर काम करणारे नियुक्ती केले कर्मचारी आहे हे कशी माहिती पडेल.
असे असताना ही अर्जदार यांना टाळाटाळ करणारी व वेळ वाया घालवणारी, मानसिक त्रास देणारी उत्तरे पाठवून त्रास देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर संबंधित विभागातील कर्मचारी अधिकारी यांच्यावर वरिष्ठाची अधिकारी लक्ष देत नसून/कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे ,त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यावर व संबंधित वर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आपणास तक्रार सादर करीत आहोत.
सदर पुरावे माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागात दाखल केलेला अर्जाची व सदर कार्यालयातुन केलेल्या पत्राची व संबंधित आरटीओ मंगेश शिंदे यांनी केलेल्या चालण्याची झेरॉक्स ची प्रति सोबत जोडलेली आहे अशी लेखी तक्रार देण्यात आली ,व मा.श्री. विवेक भीमनवार साहेब परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य ,मुंबई मा.श्री. जितेंद्र पाटील साहेब,अप्पर परिवहन आयुक्त, मुंबई. मा.किरण बिडकर साहेब
प्रादेशिक परिवहन अधिकारी विभाग नागपूर (शहर)
श्रीमती.स्नेहा मेंढे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा.याना सदर तक्रार ई-मेल करण्यात आली असून सदर तक्रारीवर येत्या सात दिवसात चौकशी व करत कारवाई न झाल्यास हा आमरण उपोषणाची बसण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी यांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!